किती ही येवो कोरोना; वेळेतच होणार विधानसभा निवडणुका

5 states elections : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
Congress - bjp
Congress - bjp Sarkarnama

मुंबई : देशात आज ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची (5 states elections) घोषणा झाली. १४ जानेवारी ते १० मार्च या दरम्यान या निवडणुका पार पडणार आहेत. देशात वाढत असलेला कोरोना विषाणुचा संसर्ग (Covid-19) आणि तिसरी लाट (Third wave) यामुळे या निवडणुका होणार की पुढे जाणार याबाबत मागच्या काही काळापासून चर्चा सुरु होती. न्यायालयाने (High Court) देखील या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोगाला सल्ला दिला होता. मात्र आता या निवडणुकांची घोषणा करण्यात आल्याने केंद्रीय निवडणुक आयोगाने टाकलेले हे धाडसी पाऊल म्हणायला हवे.

या निवडणुकांच्या घोषणेमुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आणि आकडेवर काय परिणाम होणार याकडे आता संपुर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. कारण एकूण कोरोना काळात वेळेत पार पडत असलेल्या या विधानसभेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यापुर्वीही ६ राज्यांच्या विधानसभा वेळेतच पार पडल्या होत्या. पहिल्या लाटेच्या सावटानंतर बिहार (Bihar) विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर दुसरी लाट अगदी शिगेला असताना आसाम (Assam), तमिळनाडू (Tamil-nadu), केरळ (Kerala), पश्चिम बंगालची (West Bengal) या राज्यांची निवडणूक पार पडली होती.

Congress - bjp
संपलेली टर्म अन् तिसऱ्या लाटेतही नगरसेवक थंड हवेच्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर

याच निवडणुकांनंतर देशात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. खुद्द मद्रास उच्च न्यायालयाने (Madras high court) याबाबतचे निरीक्षण नोंदवले होते. न्यायालय म्हणाले होते, कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग एकहाती जबाबदार आहे. देशात आकडेवारीने सर्वोच्च टोक गाठलेले असताना निवडणूक सभांना परवानगी दिल्यामुळे न्यायालयाने आयोगावर सणकून टीका करत आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कदाचित हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मत नोंदवले होते.

Congress - bjp
भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्राच्या तरुणांना नरक यातना; जेवणपाण्याविना हाल

त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत तिसऱ्या लाटेचे सावट आहे. अशातच निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता निवडणुकांनंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होणार की राजकीय पक्ष निवडणुक आयोगाने घालून दिलेल्या चौकटीतच राजकीय पक्ष प्रचार करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com