बांग्लादेशमधील स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पन्नाशीच्या पार; आकडा वाढण्याची शक्यता

Bangladesh | : आग लागली तेव्हा घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते.
Bangladesh
BangladeshSarkarnama

ढाका (पीटीआय) : बांग्लादेशमधील (Bangladesh एका स्फोट दुर्घटनेत मोठी जिवीत हानी झाल्याची बातमी समोर येत आहे. चितगाव जिल्ह्यातील एका रसायनांच्या खासगी गोदामामध्ये स्फोट होऊन लागलेल्या मोठ्या आगीत तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. (Huge fire broke out at a shipping container depot in Bangladesh's Chittagong) शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चितगावमधील सीताकुंड उपजिल्ह्यात कदमरसूल भागातील बीएम कंटेनर डेपोच्या गोदामात हा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे रसायनांना आग लागून ती तत्काळ पसरली. (Bangladesh huge fire broke out at a shipping container latest News)

सुरुवातीला स्फोट झाला तेव्हा या गोदामात रसायनांनी भरलेल्या कंटेनरव्यतिरिक्त कोणीही कामगारही उपस्थित नव्हते. मात्र, सुरुवातीच्या स्फोटानंतर आणि लागलेल्या आगीनंतर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि मदतीसाठी म्हणून धावलेले अनेक जण तेथे गोळा झाले. तेवढ्यात आगीमुळे रसायनांच्या कंटेनरचे एका मागून एक स्फोट होत गेल्याने आग प्रचंड भडकून अनेक जण होरपळले. त्यातच किमान ४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर साडे चारशेहून अधिक जण भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोदामात झालेल्या स्फोटांमुळे परिसरातील घरांच्या आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. गोदामापासून चार किलोमीटर लांबीपर्यंत स्फोटाचा हादरा जाणवला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याबाबतचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार टका आणि जखमींना २० हजार टका मदत जाहीर केली आहे. (Bangladesh huge fire broke out at a shipping container latest News)

कंटेनरमुळेच आग लागल्याचा अंदाज

गोदामामधील कंटेनरमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड सारखी रसायने होती. या रसायनांमुळेच आग भडकल्याचा दावा अग्नीशमन दलाने केला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास सुरु असला तरी ती कंटेनरमधील रसायनांमुळेच पसरली, असे या दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, स्फोटामुळे आग लागल्याचे म्हटले जात असले तरी स्फोट कशामुळे झाला, याचेही उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com