निवडणुकीच्या तोंडावर भाजप मुख्यालयातच कोरोनाचा उद्रेक; चाळीसहून अधिक पॉझिटिव्ह

कोरोनामुळे भाजपचीही डोकेदुःखी वाढली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजप मुख्यालयातच कोरोनाचा उद्रेक; चाळीसहून अधिक पॉझिटिव्ह
Amit Shah, Yogi Adityanathsarkarnama

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे भाजपचीही डोकेदुःखी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ (Yogi Adityanath) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) ज्या भाजप मुख्यालयात दीर्घ बैठकांमध्ये व्यस्त आहेत. त्याच परिसरातील तब्बल ४० ते ५४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या मुळे भाजपच्या मुख्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना काळात पक्षाची कोणतीही मोठी बैठक असते त्याआधी संपूर्ण मुख्यालयाचे सॅनिटायझेशन केले जाते. त्यानुसार पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या गुरूवारच्या बैठकीसाठी साऱ्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही भाजप मुख्यालयातच कार्यरत असलेल्या इतक्या कर्मचाऱ्यांना कोरोना होणे ही धोक्याची घंटा आहे. यात सफाई कामगारांची बहुसंख्या असून त्यांना कटाक्षाने विलीगीकरणात राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे.

Amit Shah, Yogi Adityanath
पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याचा कट फडणवीसांनी उलगडला..

दरम्यान, योगी आदित्यनाथ अखेर अयोध्येतून विधानसभा आनिवडणूक (Assembly elections) लढविण्याची दाट शक्यता आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच अयोध्येकडे आपला कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.

उत्तर प्रदेशात भाजप (BJP) सोडल्यावर उपमुख्यमंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्यावर दुसऱ्याच दिवशी धरपकडीची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्या पाठोपाठ योगी सरकारमधील दुसरे मंत्री दारासिंह चौहान यांनी दलित व मागासवर्गीयांची उपेक्षा केल्याचा आरोप करून भाजपला दिलेली सोडचिठ्ठी या दोन धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आजही निवडणूक व उमेदवारीबाबत दीर्घ मंथन केले. या बैठकीत स्वामी प्रसाद व दारासिंह यांच्या राजीनाम्याबाबत फारशी चर्चा झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक समितीच्या उद्या (ता. १३) होणाऱ्या बैठकीआधी पहिल्या-दुसऱ्या फेरीतील भाजपच्या उमेदवारी याद्या अंतिम करण्यावर गृहमंत्री अमित शहा व योगी आदित्यनाथ यांचा भर आहे.

Amit Shah, Yogi Adityanath
भाजप सोडताच बड्या नेत्याला मोठा झटका! 24 तासांतच निघालं अटक वॉरंट

उत्तर प्रदेशात किमान ३०० जागा आणण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखत आहे. आता मौर्य यांनी १४ तारखेला भाजपवर संक्रांत येणार व अनेक मंत्री-आमदार पक्ष सोडणार अशी भविष्यवाणी केली. या पार्श्वभूमीवर टीम योगीतील आणखी किती पक्षनेते व मंत्री आपल्या मुलांसाठी तिकीटे मागत आहेत याची सविस्तर माहिती शहा यांनी आजच्या बैठकीत घेतल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in