काँग्रेसची तीन मत रद्द होण्याच्या मार्गावर; जागा धोक्यात आल्याने पक्षात खळबळ
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

काँग्रेसची तीन मत रद्द होण्याच्या मार्गावर; जागा धोक्यात आल्याने पक्षात खळबळ

Congress | Rajya sabha Election : काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा विजय अनिश्चित

चंदीगढ : देशभरातील चार राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह, हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपने (BJP) आपल्या संख्याबळापेक्षा जास्त अधिकृत पक्षाच्या चिन्हावर किंवा समर्थन देवून अपक्ष असा एक अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळत आहे. मात्र हरियाणामध्ये भाजपचा हा डाव जवळपास यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. (Haryana State Rajya sabha Election)

हरियाणामध्ये काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार अजय माकन यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. तर भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले कार्तिकेय शर्मा हे विजयाच्या वाटेवर आहेत. हरियाणामध्ये सध्या २ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात एका मतदाराला विजयासाठी ३१ मतांचा कोटा आवश्यक होता. मात्र यात एक अपक्ष आमदार गैरहजर राहिल्याने विजयाचा कोटा ३० वर आला आहे. (Ajay Makan Latest news)

काँग्रेसकडे स्वतःचे ३१ आमदार असल्याने काळजीचे कारण नव्हते. परंतु आता काँग्रेसच्या ३ मतांवर आक्षेप घेण्यात आला असून ही मत बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. किरण चौधरी, बीबी बत्रा यांनी दुसऱ्यांनाच मतदान केल्याचा आक्षेप आहे. याशिवाय कुलदीप बिश्नोई यांच्याही मतावर आक्षेप घेण्यात आला असून त्यांनी पक्ष प्रतिनिधीला मत न दाखविल्याचा दावा आहे. स्वतः बिश्नोई याबाबत बोलताना म्हणाले, काळजी नसावी. मी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान केले आहे.

सध्या हरियाणाच्या ९० सदस्यांची विधानसभेमध्ये भाजपकडे ४० आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ३१ आमदार आहेत. याशिवाय जननायक जनता पक्षाचे १० आणि अन्य ९ आमदार आहेत. या ९ आमदारांपैकी ६ आमदार भाजप समर्थक आहेत. याच भाजपच्या अतिरीक्त आणि जननायक जनता पक्ष आणि अन्य आमदारांच्या समर्थनावर कार्तिकेय शर्मा यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मात्र आता काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांच्या पारड्यातील तीन मत धोक्यात आल्याने कार्तिकेय यांची दिल्लीची वाट सुकर झाल्याचे मानले जात आहे. पण अखेरच्या क्षणी निकाल काय लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in