Yogi Aadityanath News: योगी सरकार गुन्हेगारांसाठी ठरतंय 'कर्दनकाळ'! ; उत्तर प्रदेशात 15 दिवसाला...

Uttar Pradesh News : योगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेशमध्ये 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर....
UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
UP CM Yogi Adityanath Latest Marathi NewsSarkarnama

Uttar Pradesh : प्रयागराजमध्ये कुख्यात गुंड दहशतवादी धर्मांध अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं होतं. गुन्हेगारी हीच काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशची ओळख होती. गुन्हेगारांच्या नावावरून ओळख निर्माण झालेले उत्तर प्रदेश हे बहुदा एकमेव राज्य होते. मात्र, आता तेथील माफिया आपली ओळख सांगणार नाहीत असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

याचवेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी संपुष्टात आली असल्याची ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात दिली होती. याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

योगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेश (Uttar Pradesh)मध्ये 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आले आहेत. म्हणजेच दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2017 ते आत्तापर्यंत योगी आदित्यानाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी, दहशत मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्यूला ठरला; कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर.

उत्तर प्रदेशमध्ये आता कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही. पूर्वी उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांची नावे बदनाम झाली होती. या जिल्ह्यांच्या नावाच्या उल्लेखानेही सर्वसामान्य भयभीत होत असत. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता येथे कायद्याचे राज्य प्रस्थापित झालेले आहे. त्यामुळे येथे दंगली होत नाहीत, तसेच गुन्हेगार किंवा माफिया कोणा उद्योजकाला फोनवरूनसुद्धा धमकावू शकत नाहीत.

उत्तर प्रदेश हे आता ‘उद्योगांचे राज्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Aadityanath) यांनी केला आहे. तसेच आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईनंतर उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारांची धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
BJP Politics Behind Sengol: नेहरू, तामिळनाडू, मोदी आणि संसदेतील राजदंड; लोकसभेतल्या 39 जागांशी काय आहे संबंध!

योगी सरकारच्या काळात 2017 पासून आत्तापर्यंत 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर म्हणजे दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या 5046 इतकी आहे. तर पायात किंवा शरीराच्या इतर भागात गोळी लागल्याने जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या 5,046 आहे. म्हणजेच दर 15 दिवसांनी 30 हून अधिक कथित गुन्हेगार गोळी लागल्याने जखमी होतात एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबतचा पोलिसांचा अहवाल सादर केला आहे.

उत्तरप्रदेश(Uttar Pradesh)मध्ये गुंड आणि पोलीस यांच्या चकमकीत ठार झालेल्या एकूण 186 गुन्हेगारांपैकी 96 गुन्हेगारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच काही गुन्हेगारांवर विनयभंग, गँगरेप आणि पॉक्सोसारखे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 2016 ते 2022 या कालावधीत राज्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने घसरला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, घरफोडीच्या घटनांमध्ये 87 आणि खुनाच्या घटनांमध्ये 37% घट झाली आहे.

UP CM Yogi Adityanath Latest Marathi News
Devendra Fadnavis On Ambedkar : आंबेडकरांचा 'मविआ'वरुन ठाकरेंना मोलाचा सल्ला; फडणवीस म्हणाले,''बाळासाहेब कधी कधी..''

गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमदची खुलेआम हत्या

काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद(Atique Ahmed) आणि अशरफ अहमदची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशी हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com