रशिया-युक्रेन वॉर: 1730 युक्रेनियन सैनिकांची शरणागती; रशियाचा दावा

Russia Ukraine War News| Red Cross | रेड क्राॅस संस्थेने मंगळवारपासून युद्धकैदी बनलेल्या युक्रेन सैनिकांच्या नावांची नोंदणी सुरू केली.
Russia Ukraine War News
Russia Ukraine War News

Russia Ukraine War News :

नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मारियोपोल शहरात रशियन सैनिकांशी लढणाऱ्या तब्बल १७३० युक्रेनियन सैनिकांनी शरणागती पत्करली आहे. त्यातील अनेक सैनिक गंभीर जखमी आहेत. ज्यांना रशियन-नियंत्रित नोवोआझोव्स्क शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेड क्रॉस संस्थेने दिली आहे.

दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील मारियुपोल शहरातील अज़ोवस्टल स्टील प्लांटमध्ये लपलेल्या 959 युक्रेनियन सैनिकांनी या आठवड्यात आत्मसमर्पण केले. गेल्या 24 तासांत 694 सैनिकांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये 29 जखमी झाले आहेत. तर 16 मे पासून एकूण 959 सैनिकांनी आत्मसमर्पण केले आहे, ज्यामध्ये 80 जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना रशियन-नियंत्रित नोवोआझोव्स्क शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Russia Ukraine War News
लालू प्रसाद यादवांचा नवा घोटाळा; बिहारच्या १५ ठिकाणांवर सीबीआय'ची छापेमारी

रेड क्राॅस संस्थेने मंगळवारपासून युद्धकैदी बनलेल्या युक्रेन सैनिकांच्या नावांची नोंदणी सुरू केली. रशिया- युक्रेन दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार रेड क्राॅस हे काम करीत आहे. रेड क्रॉस संस्थेला युद्ध कैद्यांसंदर्भातील प्रकरणे हाताळण्याचा मोठा अनुभव आहे.

अनेक दिवस युक्रेनियन सैनिक अझोवत्साल स्टील प्रकल्पाच्या आडोशाने रशियन सैनिकांना झुंज देत होते. मात्र युक्रेन लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैनिकांना प्रतिकार थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक युक्रेनच्या सैनिकांनी रशियासमोर शरणागती पत्करली. मारियुपोलमधील हा स्टिल प्लांट युक्रेनच्या सैनिकांचा हा शेवटचा बालेकिल्ला होता, तो नष्ट केल्याशिवाय त्या शहरावर रशियाला संपूर्ण ताबा मिळविणे शक्य नसल्याने रशियाने सातत्याने या स्टील प्रकल्पावर बॉम्बहल्ले करून तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यानंतर अनेक युक्रेनियन सैनिकांनी शरणागती पत्करली. हे शरणागती पत्करलेले सर्व सैनिक रशिया पुन्हा युक्रेनला सुपुर्द करतील, अशी आशा युक्रेनने व्यक्त केली.

ब्रिजेट ब्रिंक अमेरिकेच्या युक्रेनमधील राजदूत

दरम्यान, अमेरिकी सिनेटने अमेरिकेच्या युक्रेनमधील राजदूत म्हणून ब्रिजेट ब्रिंक यांची नियुक्ती केली आहे. सोव्हिएत रशिया, त्यानंतर त्याचे झालेले विघटन, विद्यमान रशिया यांचा सखोल अभ्यास ब्रिजेट ब्रिंक यांनी केला आहे. ब्रिंक यांनी रशियाविषयक अनेक घडामोडी जवळून पाहिल्या आहेत.माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2019 मध्ये तत्कालीन राजदूत मेरी योव्हानोविच यांना अचानक काढून टाकल्यानंतर युक्रेनमधील अमेरिकेचे राजदूत हे पद रिक्त आहे.विशेष म्हणजे ब्रिंक हे स्लोव्हाकियाचे राजदूत राहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com