द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; विरोधकांचे तब्बल १७ खासदार फुटले

Draupadi Murmu | President Of india : मतमोजणी सुरू असतानाच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या.
Draupadi Murmu News Latest news
Draupadi Murmu News Latest newssarkarnama

Presidential Election 2022 :

नवी दिल्ली : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. त्यांनी युपीएच्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या निकालानंतर मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. या निवडणुकीतील आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे विरोधी आघाडीतील तब्बल १७ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे.

मतदानादिवशी लोकसभा आणि राज्यसभा यातील देशातील तब्बल ७७१ खासदारांपैकी ७६३ खासदारांनी मतदान केले होते. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना ५४९ खासदारांनी कौल दिला, तर यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांचा कौल मिळाला. तर १५ खासदारांची मत अवैध ठरली होती. मुर्मू यांना मिळालेल्या ५४९ खासदारांपैकी भाजप, मित्रपक्ष आणि पाठिंबा दिलेल्या पक्षांच्या खासदारांची संख्या ५३२ एवढीच होती. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीतील १७ खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले.

दरम्यान, निवडणुकीची (Presidential elections results) मतमोजणी सुरू असताना मुर्मू (Draupadi murmu) या आघाडीवर होत्या. त्यामुळे त्या विजयी होतील असे मतमोजणी सुरु असतांनाच बोलले जात होते. त्यानुसार त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे देशभरात भाजपकडून सेलिब्रेशन सुरू झालं आहे. (presidential elections result news update)

मुर्मू यांना पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती पहिल्या फेरीत ५४० मते मिळाली तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीमध्ये मुर्मू यांनी आघाडी कायम ठेवत ८०९ मते मिळवली होती. तर सिन्हा यांना दुसऱ्या फेरीमध्ये फक्त ३२९ मते मिळवता आली होती. मुर्मू यांना या दोन्ही फेऱ्यांमध्ये एकून १ हजार ३४९ मते मिळाली होती. तर सिन्हांना (Yashwant Sinha) फक्त ५३७ मते मिळाली होती. मुर्मू यांनी तब्बल ८०० मतांची आघाडी घेतली होती तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in