आता डासांपासून धोका; कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या राज्यातच 'झिका'चा शिरकाव  - 14 Zika virus cases confirmed in Kerala 13 are Health workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आता डासांपासून धोका; कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या राज्यातच 'झिका'चा शिरकाव 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

झिका हा आजार एडिस इजिप्ती हा डासाने दंश केल्याने होतो.

तिरूअनंतपुरम : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा नवे संकट उभे ठाकले आहे. ज्या राज्यांत देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्याच केरळमध्ये झिका विषाणूचे चौदा रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (NIV) केरळमधील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून या रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. (14 Zika virus cases confirmed in Kerala 13 are Health workers)

देशात कोरोना पहिला रुग्ण केरळमध्ये 30 जानेवारी रोजी आढळून आला होता. चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थ्याला संसर्ग झाला होता. आता याच केरळमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. झिका हा आजार एडिस इजिप्ती हा डासाने दंश केल्याने होतो. केरळमध्ये काही वर्षांपूर्वीही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. आता एक 24 वर्षीय गर्भवती महिला केरळमधील झिकाची पहिली रुग्ण ठरली आहे. 

हेही वाचा : विरोधकांचे महिलेशी गैरवर्तन अन् सहा पोलिस तडकाफडकी निलंबित

केरळ राज्यातील NIV मध्ये एकूण 19 नमूने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 14 रुग्णांना झिकाचा संसर्ग झाला असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या आजाराची लक्षणे डेंग्यू या आजारासारखीच आहेत. ताप, सांधेदुखी अशी लक्षणे झिकामध्ये आढळून येत आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॅार्ज यांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने नियोजन सुरू केले आहे.  

जॅार्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 14 बाधितांपैकी 13 जण आरोग्य कर्मचारी आहेत. हे रुग्ण राहत असलेली ठिकाणी तसेच त्यांच्या प्रवासाबाबतची माहिती संकलित केल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्या जातील. विविध विभागांमार्फत समन्वय साधून कार्यवाही केली जाईल. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, असे जॅार्ज यांनी सांगितले. 

दरम्यान, झिकाचे रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारकडून सहा सदस्यांची टीम तातडीने केरळमध्ये पाठवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या सहकार्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. केरळमध्ये अजूनही कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. त्यातच झिकाचे रुग्ण आढळल्याने धोका अधिक वाढला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख