Madhya Pradesh : दिवाळीसाठी घरी जाणारे १५ प्रवाशी ठार : बस अपघातात ३५ जण जखमी

Madhya Pradesh : मध्य प्रदेशाच्या रेवालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर एका बसला भीषण अपघात झाला आहे.
madhya pradesh rewa latest news and update
madhya pradesh rewa latest news and updatesarkarnama

Madhya Pradesh : ऐन दिवाळी झालेल्या बस अपघातात १५ जणांचा आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शुक्रवारी रात्री मध्यप्रदेशात घडली. हे सर्वजण दीपावली साजरी करण्यासाठी घरी जात होते. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 35 जण जखमी झाले आहे. मध्य प्रदेशाच्या रेवालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर एका बसला भीषण अपघात झाला आहे. (madhya pradesh rewa latest news and update)

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी सतनाला येत आहेत. सोहागी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात त्योंथर सरकारी रुग्णालयात हलवले.त्योंथर रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजेपर्यंत 55 जणांना दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने सोहागी डोंगरावर मदत कार्य सुरु केले आहे. मदतीसाठी काही क्रेनही आरटीओ मनीष त्रिपाठी यांनी बोलावले आहेत.

सोहागी डोंगरावरून उतरणारी एक बस समोरच्या एका ट्रेलरमध्ये शिरली. बस हैदराबादून रेवामार्गे गोरखपूरला जात होती. हा अपघात शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला. अपघाताचे कारण अद्याप समजले नाही.

madhya pradesh rewa latest news and update
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललयं तरी काय ?

डोंगरावरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.बसच्या कॅबिनमध्ये जवळपास 3-4 प्रवाशी अडकले होते. जखमींत बहुतांश कामगारांचा समावेश आहे. सर्वजण दीपावली साजरी करण्यासाठी घरी जात होते.या अपघाता मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याचे मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com