हिमाचलमध्ये भाजपची डोखेदुखी वाढली; मोठ्या प्रमाणात बंडखोरी

बंडखोरी केल्यामुळे पाच नेत्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे
BJP
BJP Sarkarnama

Himachal Pradesh News : विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ३० टक्के आमदारांना वगळून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) चांगलेच संकटात सापडले आहे. हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) उमेदवारी देण्याचे नाकारल्यामुळे तब्बल ११ जणांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

BJP
Gujrat Election : अखेर गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान!

भाजपने प्रयत्न करुन सुद्धा हे बंडखोर उमेदवारी मागे घेण्यास तयार नसल्यामुळे भाजपची डोखेदुखी वाढली आहे. हिमाचलमध्ये भाजपने बंडखोरांविरोधात कडक कारवाई करत पाच जणांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. मात्र, तरीही इतर नेते अर्ज मागे घेत नसल्याने भाजपपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी हिमाचलचे राजकारण चांगलेच तापले आहे.

BJP
Shivsena : 'मशालीचा' वाद अखेर शमला : समता पार्टीची याचिका फेटाळली!

भाजपने चार माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्षांची हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये माजी आमदार तेजवंत सिंह नेगी, माजी आमदार किशोरी लाल, मनोहर धीमान, केएल ठाकूर आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष कृपाल परमार यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in