KCR
KCRSarkarnama

'टीआरएस'च्या चार आमदारांना १०० कोटींची ऑफर? मुख्यमंत्री केसीआर यांचा भाजपवर निशाणा!

Telangana : 'ते' चार आमदार केसीआर यांच्या व्यासपीठावर उपस्थित

तेलंगणा : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याच्या प्रयत्न केला गेला याबाबत मोठे विधान केले आहे. आपल्या पक्षाच्या चार आमदारांना दिल्लीतील दलालांनी विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. "आज मी माझ्या आमदारांसोबत एकाच व्यासपीठावर आहे. आपल्याला कोणीही तोडू शकत नाही. दिल्लीतील दलालांनी तेलंगणाच्या स्वाभिमानाला आव्हान दिले होते. त्यांनी आमच्या चार आमदारांना 100 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजरवर टीका केली आहे.

केसीआर पुढे म्हणाले की, माझ्या आमदारांनी दललांच्या प्रयत्नांविरोधात आवाज उठवल्यामुळे मी आज हे बोलत आहे. त्यांना फक्त तेलंगण बळकावायचे आहे. मी शेतकर्‍यांना सांगतोय की, मतदान करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लाच देऊन कोणीही आपली फसवणूक करू शकत नाही.

KCR
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी पळाले..; Video व्हायरल

काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी केलेल्या आरोपांवर भाजपने हल्लाबोल केला होता. तेलंगणातील ‘ऑपरेशन लोटस’चे आरोप भाजपने पोटनिवडणुकीशी जोडले होते. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला पक्ष सामील होईल, असे म्हटले होते.

KCR
South Korea : हॅलोविन पार्टीत हॉरर शो: चेंगराचेंगरीत 151 ठार, 80 हून अधिक जखमी

या प्रकरणी टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस एफआयआरमध्ये दिल्लीचे रहिवासी रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा आणि हैदराबादचे रहिवासी नंद कुमार हे दोघेही भाजपशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. या दोघांवर आरोप आहे की, त्यांनी टीआरएस आमदारांची भेट घेतली, पुढील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली. त्यासाठी त्यांना १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असे म्हंटले गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in