Basavraj Bommai : सोलापुरात कन्नड भवनसाठी १० कोटी; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काढली महाराष्ट्राची खोड

शेजारी राज्यातील सीमावर्ती भागातील शाळांसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात येईल, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले.
Basavraj Bommai
Basavraj BommaiSarkarnama

बेळगाव : सोलापूर (Solapur), गोव्यासह केरळमधील कासरगोडमध्ये कन्नड भवन निर्मितीसाठी प्रत्येक १० कोटी निधी देण्यात येईल. कर्नाटकातील भाविकांसाठी पंढरपूर (Pandharpur), तुळजापूर (Tuljapur), श्रीशैल, अय्यप्पा देवालय आदी ठिकाणी यात्री निवासी केंद्राची स्थापना केली जाईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज केली. (10 crores for Kannada Bhavan in Solapur : Basavaraj Bommai)

सीमा भागाच्या जिल्ह्यांतील १८०० ग्रामपंचायतींच्या संपूर्ण विकासाचे काम सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, तामीळनाडू, गोवा, केरळ, तेलंगणा राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शेजारी राज्यातील सीमावर्ती भागातील शाळांसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात येईल, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग (जि. बेळगाव) येथे ६७१.२८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना चालना व कोनशीला बसविण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते.

Basavraj Bommai
Solapur विमानसेवा-‘सिद्धेश्वर’ची चिमणी वादात सुशीलकुमार शिंदेंची उडी : म्हणाले, ‘हे फुजूल आहे सगळं...’

सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्‍न दाव्याच्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसापासून जोरदार हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात तणावस्थिती उद्‍भवली आहे. बेळगावसह सीमाभागामध्ये त्याचे पडसाद उमटल्यामुळे गेल्या आठवड्यात आंतरराज्य बससेवा बंद होती. या साऱ्या घडामोडीमुळे कर्नाटकाचे नेते चांगलचे बिथरले आहेत.

Basavraj Bommai
Tukaram Gadakh : नगर लोकसभेत राष्ट्रवादीला विजय मिळवून देणारा नेता काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र विरोधात बोलणे सुरु केले आहे. कन्नड भाषकांचा विकास व रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. कन्नड भाषक देशातील कोणत्याही भागात किंवा कोणत्याही राज्यात असले तरी त्यांचे रक्षण आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत.

Basavraj Bommai
महाजन-पाटलांचे आव्हान खडसे मोडीत काढणार? : जळगाव जिल्हा दूध संघासाठी पुन्हा लढाई

या वेळी कार्यक्रमास पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, लघु आणि अवजड उद्योग मंत्री हणमंत निराणी, नगरविकास मंत्री बी. व्ही. बसवराज, केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार मंगला अंगडीसह आमदार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com