कोरोना रुग्णांबाबतच्या भेदभावाबाबत नायडूंनी व्यक्त केला खेद

रुग्णांबाबत भेदभाव करण्याच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. संक्रमित रुग्णांना मदत आणि संवेदनशीलतेची जेव्हा अपेक्षा असते त्याच वेळी समाज त्यांच्याशी अशी क्रूर वागणूक करतो हे निरोगी समाजाचे लक्षण नाही, असे वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे
Venkaiah Naidu Expresses Displeasure about Discrimination of Corona Patients
Venkaiah Naidu Expresses Displeasure about Discrimination of Corona Patients

नवी दिल्ली  : कोरोना संक्रमित रुग्णांबाबत समाजाकडून होणाऱ्या भेदभावाबाबत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कारदेखील योग्य पद्धतीने, सन्मानाने केले जात नाहीत आणि अशा मानसिकतेच्या वृत्तींना मुळापासून उखडून टाकायला हवे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली.

कोरोना रुग्णांबद्दल भेदभाव करणाऱ्या सामाजिक कुप्रवृत्तींना रोखण्यासाठी समाजानेच पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले. नायडू यांनी म्हटले की, रुग्णांबाबत भेदभाव करण्याच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. संक्रमित रुग्णांना मदत आणि संवेदनशीलतेची जेव्हा अपेक्षा असते त्याच वेळी समाज त्यांच्याशी अशी क्रूर वागणूक करतो हे निरोगी समाजाचे लक्षण नाही. हा अदृश्य तेवढाच घातक विषाणू आहे. तो कोणालाही आणि कधीही संक्रमित करू शकतो. एकही माणूस त्यापासून कायमस्वरूपी सुरक्षित नाही, असा इशाराही नायडू यांनी दिला. 

मानवता, दया आणि करुणा हीच ज्या भूमीची संस्कृती आहे अशा भारतामध्ये covid-19 रुग्णांबद्दलच्या या भेदभावपूर्ण मानसिकतेला थारा नाही असे सांगून नायडू म्हणाले की अंत्यसंस्कारावेळी रुग्णांच्या मृतदेहांचीही अवहेलना करण्याचे प्रकार घडतात हे संतापजनक आहे. जेथे शोकसंतप्त कुटुंबीयांना सांत्वन देण्याची गरज आहे तेथे  मृतदेहालागी योग्य सन्मान न देणे हे भारतीय मूल्यांच्या विरोधात आहे. असे प्रकार घडण्यामागे मुख्य कारण या महामारीबद्दल पुरेशी जागृती आजही समाजात नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या अंधश्रद्धांना आणि अनिष्ट समजुतींना जन्म मिळतो. कोरोनाबाबत आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका अधिक सजगपणे बजावणे आवश्यक आहे. या महामारी बद्दल व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरजही नायडू यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या वेढ्यातून भारत निश्चितपणे लवकरच मुक्त होईल, अशी आशा करताना नायडू यांनी म्हटले आहे की सर्वप्रथम रुग्णसंख्येचा वाढता आकडा स्थिर होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी अधिक जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित आहे. मास्क लावणे, सामाजिक अंतरभान पाळणे ( दो गज की दूरी) आणि वारंवार हात धुणे या आरोग्य उपायांचे कायमस्वरूपी पालन करण्याची सवय प्रत्येकानेच अंगी बाळगून घ्यायला हवी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगसाधनेचाही मोठा उपयोग होतो. 

कोरोना लढाईच्या काळात डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि देशाचा अन्नदाता शेतकरी या कोरोना योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात पुढे यायला हवे अशी अपेक्षाही नायडू यांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com