हवेली दुरूस्त करण्याचीही ताकद नसलेल्या जमीनदारासारखी काँग्रेसची अवस्था!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.
Sharad Pawar has commented on present situation of Congress
Sharad Pawar has commented on present situation of Congress

मुंबई : एकेकाळी जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात काँग्रेसची (Congress) सत्ता होती. पण मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचं पानिपत झालं. केवळ तीन राज्यांमध्ये पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. मागील काही महिन्यांपासून पूर्णवेळ अध्यक्षही नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी काँग्रेसची आजची स्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar has commented on present situation of Congress)

शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या स्थितीवर हे भाष्य केलं आहे. याविषयी बोलताना पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, एका जमीनदाराकडं हजारो एकर शेती, गावात हवेली होती. पण लँड सिलिंगचा कायदा आला अन् जमीन गेली. हवेली तशीच राहिली तरी त्याची दुरूस्ती करण्याची ताकद त्याच्यात नाही. हजारो एकर जमिनीपैकी आता केवळ 15-20 एकर जमीन उरली आहे. 

हा जमीनदार सकाळी उठून हवेलीतून बाहेर येत म्हणतो की, ही आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती माझी होती. तो माझं होतं असं म्हणतो. पण आता ते नाही, असं सांगत पवार यांनी काँग्रेची अवस्था याच जमीनदारासारखी झाल्याचं सुचक विधान केलं. पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस होती. पण ती होती, आता नाही. हे पक्षानं मान्य करायला हवं. ही मानसिकता बदली तर इतर जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. 

काँग्रेसवर टीका करता पवार यांनी हा आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे, असंही सांगितलं. काँग्रेस देशभर पसरली आहे. लोकसभेत दीडशेच्या पेक्षा संख्याबळ असल्यानं काँगेसनं युपीएसारखा प्रयोग केला. आज ती स्थिती नाही. काँग्रेसकडं केवळ चाळीस जागा आहेत, याकडंही पवार यांनी लक्ष वेधलं. 

विरोधकांमध्ये समन्वयासाठी प्रयत्न करेन

राजकीय रणणीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईसह दिल्लीतही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर किशोर हे राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनाही भेटले होते. त्यावर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, प्रशांत किशोर यांच्या मदतीची मला गरज नाही. तसेच सत्तेचीही महत्वाकांक्षा नाही. पण विरोधकांमध्ये समन्वय घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुतोवाचही त्यांनी केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com