रामदेवबाबांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी : IMA म्हणाली आता खूप झाले.... - IMA demands FIR against ramdevbaba for speeding false information | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

रामदेवबाबांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी : IMA म्हणाली आता खूप झाले....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 22 मे 2021

रामदेव यांनी बेताल विधाने केल्याचा आरोप

नवी दिल्ली ः ॲलोपॅथी उपचारांवर टीका करणे योगगुरू रामदेवबाबा (Ramdevbaba) यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (IMA) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health minister Dr. Harshwardhan) यांना लिहिण्यात आले आहे.(IMA Demands criminal action against Yogguru Ramdev)

‘‘रामदेव यांच्यावर साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करा किंवा त्यांच्या आरोपांचा स्वीकार करत सर्व अत्याधुनिक अॅलोपॅथी उपचार केंद्रे बंद करा.’’ अशी टोकाची भूमिका संघटनेने घेतल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

वाचा ही बातमी- चंद्रकांत पाटील म्हणतात मी फक्त मोदींना ओळखतो...

‘रामदेवबाबांचे बेताल आरोप आता पुरे झाले’ असा इशारा देतानाच ‘आयएमए’ने या संसर्गकाळाचा वारंवार गैरफायदा घेत ते लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असून या माध्यमातून स्वतःची बेकायदा औषधे विकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मध्यंतरी रामदेवबाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता त्यात ॲलोपॅथी उपचारांची खिल्ली उडवितानाच त्यांनी लोकांच्या मृत्यूला देखील हीच उपचारपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप होता. काही अॅलोपॅथी औषधांना देखील त्यांनी आक्षेप घेतला होता.

 

आयएमए म्हणते
रामदेवबाबा यांनी आधीच डॉक्टरांना खुनी ठरविले
स्वतः रामदेव, बालकृष्ण हे ॲलोपॅथीचे उपचार घेतात
बेताल विधानामुळे आरोग्य मंत्रालयावर प्रश्‍नचिन्ह
रामदेव यांच्या वक्तव्यांचा लोकांवर परिणाम होतोय
आरोग्य मंत्रालय, औषध नियंत्रकांना रामदेव यांचे आव्हान
रामदेवबाबांमुळे हजारो लोकांचे प्राण संकटामध्ये

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख