..तरच शेतकऱ्यांशी चर्चा करणार; केंद्राचा ताठर पवित्रा - Government adamant about Discussion with Farmer Leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

..तरच शेतकऱ्यांशी चर्चा करणार; केंद्राचा ताठर पवित्रा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ९१ व्या दिवशीही ही कोंडी फुटलेली नाही. कायदे मागे घेणे, या एका मुद्यावर सरकार व शेतकरी नेत्यांच्या भूमिका आजही तेवढ्याच ताठर असल्याने आंदोलनाबाबतची चर्चेची पुढील, १२ वी फेरी कधी होणार हेही धूसर आहे

नवी दिल्ली : शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेचे दरवाजे सरकारने कायम खुले ठेवले आहेत. मात्र सरकारने कृषी कायदे पुढचे वर्ष-दीड वर्ष स्थगित ठेवण्याचा व दरम्यान कायद्यांतील दुरूस्त्यांबाबत संयुक्त समिती स्थापन करण्याचे जे प्रस्ताव दिले त्यांच्यावर शेतकरी नेत्यांना चर्चेच्या टेबलावर येण्याआधी ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कायदे रद्द होईपर्यंत आंदोलनाची व्याप्ती वाढवून देशभरात आंदोलन नेण्यात येईल असा निर्धार शेतकरी नेत्यांनी पुन्हा व्यक्त केला.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ९१ व्या दिवशीही ही कोंडी फुटलेली नाही. कायदे मागे घेणे, या एका मुद्यावर सरकार व शेतकरी नेत्यांच्या भूमिका आजही तेवढ्याच ताठर असल्याने आंदोलनाबाबतची चर्चेची पुढील, १२ वी फेरी कधी होणार हेही धूसर आहे. मात्र शेतकरी नेत्यांनी सरकारच्या नव्या प्रस्तावावरील निर्णय आधी द्यावा मगच चर्चा होईल असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी स्पष्ट केले. 

सरकार व शेतकरी यांच्यातील चर्चेची अखेरची फेरी २२ जानेवारीला झाली. मात्र प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा बंद झाली व तशी शक्‍यताही दिसेनाशी झाली. तथापि सरकार व शेतकरी हे दोघे 'आम्ही चर्चेला नाही कधी म्हणालो?' असा प्रतिप्रश्‍न अजूनही करताना दिसतात. भारतीय किसान युनियने प्रवक्ते राकेश टिकैत यांनी, संसदेवर चार लाख ट्रॅक्‍टरचा मोर्चा नेऊ व संसदेच्या फुलबागेतही शेतकरी गहू व धान्ये पिकवतील असा ईशारा दिला. 

त्यांच्या ताज्या वक्तव्यावर तोमर यांनी भाष्य करण्याचे टाळले. मात्र दोन्ही बाजूंत पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते याचे संकेत दिले. कृषी कायदे पुडील दीड वर्षापर्यंत स्थगित ठेवण्याच्या व या दरम्यान संयुक्त समितीच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर शेतकरी नेते विचार करतील व निर्णय घेतील तर सरकार चर्चेला कधीही तयार आहे असे तोमर म्हणाले. त्यांनी सांगितले की सरकार पूर्ण संवेदनशीलपणे या आंदोलनाकडे पहाते. अन्नदात्याचे हे आंदोलन क्‍लेशकारक असून ते लवकरात लवकर संपावे यासाठी चर्चा हाच प्रभावी मार्ग आहे. सरकारची तयारीही आहे पण शेतकरी नेत्यांनी आमच्या नव्या प्रस्तावांवर आधी निर्णय घ्यावा . त्यांच्याकडून त्यावर कोणताही निर्णय आला तरी पुन्हा चर्चा सुरू होण्यात काही अडचण सरकारकडून तरी नाही
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख