गोंधळ घालणाऱ्यांना उघडे पाडा, संसदेचे कामकाज बंद पडल्याने मोदी भडकले..

संसदेचे कामकाज चालू दिले जात नसल्याबद्दल पंतप्रधानांनी आजच्या भाजप बैठकीत संताप व्यक्त केला.
PM Narendra Modi Angrey News Dehli
PM Narendra Modi Angrey News Dehli

नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गोंधळाला कॉंग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवताना, सर्वांत जुना पक्षच संसद चालू देत नाही, हे भाजप खासदारांनी जनतेला सांगावे, (Expose those who are making a fuss, Modi got angry as Parliament was closed) अशा शब्दांत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

भाजप संसदीय पक्षाची बैठक आज बालयोगी सभागृहात झाली. भाजपच्या या दोन्ही बैठकांच्या वेळी संसदेचे कामकाज ठप्प पडले. ( PM Narendra Modi Angrey)मोदी यांनी गोंधळाबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की गोंधळ करणाऱ्यांना जनतेसमोर उघडे पाडा. कॉंग्रेस सर्वांत जुना पक्ष म्हणवतो व तोच संसद कामकाज ठप्प पाडतो व तुमचे मुद्दे संसदेत येऊ देत नाही हे जनतेत जाऊन सांगा.

जेव्हा सरकारने कोवीड-१९ बाबत बैठक बोलावली तेव्हा कॉंग्रेसने स्वतः बैठकीवर बहिष्कार टाकला आणि एवढेच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनाही बैठकीला येण्यापासून अडविले. कॉंग्रेस व विरोधकांचे हे `कार्य` तुम्ही जनतेत जाऊन सांगा.

पेगॅसग हेरगिरी, भडकलेली महागाई व कृषी कायदे रद्द करण्यासाठी विरोधकांनी संसदेचे कामकाज मागील आठवडा व या आठवड्याच्या सुरवातीला बंद पाडले आहे. संसदेचे कामकाज चालू दिले जात नसल्याबद्दल पंतप्रधानांनी आजच्या भाजप बैठकीत संताप व्यक्त केला व संसदीय अधिवेशन चालत नाही याचे सारे खापर कॉंग्रेसवर फोडले.

यशाची माहिती लोकांपर्यंत पोचवा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्ताधारी खासदारांनी गावागावात लोकांना स्वातंत्र्यलढ्याची , स्वातंत्र्य सैनिकांची व स्वातंत्र्योत्तर काळात देशाने मिळविलेल्या विविध क्षेत्रातील यशाची माहिती द्यावी. प्रत्येक खासदाराने वर्षभरात यासाठी ७५ गावांत जावे, ७५ तास थांबून गावकऱ्यांशी संवाद साधावा.

त्याची माहिती पक्षाला कळवावी. आझादी ॲट ७५ हा केवळ सरकारी कार्यक्रम होऊ नये. त्यात जनतेचा थेट सहभाग वाढावा यासाठी भाजप खासदारांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत, असे आदेशही पंतप्रधानांनी दिले.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com