भारतीय संघातील निवडीवर ऋतुराज म्हणाला, छान वाटतंय, मेहनतीचे फळ मिळाले... - on the selection in the indin team ruturaj said feel good | Politics Marathi News - Sarkarnama

भारतीय संघातील निवडीवर ऋतुराज म्हणाला, छान वाटतंय, मेहनतीचे फळ मिळाले...

उत्तम कुटे
शनिवार, 12 जून 2021

ऋतुराज सुरुवातीपासून या अकादमीत सराव करत होता. आज त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अकादमी उभारण्यापूर्वी त्या जागेचा वापर स्थानिक रहिवासी प्रातःविधीसाठी करीत होते. म्हणून अकादमी सुरू झाल्यानंतर तेथे कोण खेळायला येणार अशी चर्चा होती.

पिंपरी : आयपीएलमधील Indian Primier League चमकदार कामगिरीनंतर पिंपरी-चिंचवडमधील Pimpri-Chinchwad सांगवीचा ऋतुराज गायकवाड Ruturaj Gaikwad याची भारतीय क्रिकेट संघात India Cricket Team आता निवड झाली आहे. त्यावर छान वाटतंय, Feel Good घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया त्याने ‘सरकारनामा’ला आज दिली.

दरम्यान, ऋतुराजच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी उभारण्याचे स्वप्न या निवडीने साकार झाले, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ऋतुराजचे अभिनंदन करीत त्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या निवासस्थानापासून जवळच ही अकादमी आहे. ते नगरसेवक असताना पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान, दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या मदतीने आणि पुढाकाराने ही अकादमी उभारण्यात आलेली आहे.

ऋतुराजच्या भारतीय  संघातील निवडीचे श्रेय खासदार बारणे यांनी वेंगसरकर यांनाही दिले. त्यांचे प्रचंड श्रम, कष्ट अकादमी व ऋतुराजच्या निवडीमागे आहेत, असे ते म्हणाले. ते दर आठवड्याला मुंबईहून अकादमीत येतात आणि खेळाडूंचा सराव घेतात. या अकादमीचा सरावाचा मोठा फायदा झाला, असे ऋतुराज म्हणाला. या निवडीनंतर मुंबईत सराव करीत असलेला ऋतुराज घराच्या दिशेने निघाला आहे. २८ तारखेला श्रीलंकेला जाणार असल्याची माहिती त्याने दिली. भारतीय संघात निवड झाली असली, तरी शेवटच्या ११ जणात समावेश होईल का, असे विचारले असता ते माझ्या हातात नाही, असे त्याने प्रांजळपणे सांगितले.

२४ वर्षीय ऋतुराज महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंगकडून खेळत आहे. तेथील चमकदार कामगिरीमुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. ४५ टी-२० सामन्यांत त्याने १३३७ धावा केल्या असून त्यात ११ अर्धशतके आहेत. मे महिन्यात तो शेवटचा सामना मुंबई इंडियनविरुद्ध दिल्लीत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऋतुराज याअगोदर आयपीएलसह भारत अ, भारत ब आणि २३ वर्षाखालील भारतीय संघाकडून खेळलेला आहे. आता १३ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. श्रीलंकेत तीन एक दिवसीय आणि तीन टी -२० सामने भारतीय संघ खेळणार आहे.

बारणे हे नगरसेवक असताना थेरगावचे प्रतिनिधित्व करत होते. शहरातील क्रिकेटप्रेमींना सराव करता यावा, शहरातून देशासाठी खेळणारे खेळाडू घडावेत, हा उद्देश ठेवून त्यांनी थेरगावातील मोकळ्या मैदानावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी उभारली. तिचे उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते झालेले आहे. ऋतुराजच्या निवडीनंतर खासदार बारणे म्हणाले, वेंगसरकर अकादमीत सराव करणारा खेळाडू भविष्यात भारतीय टीममध्ये देशासाठी खेळावा, हे माझे स्वप्न होते. ऋतुराजमुळे ते पूर्ण झाले आहे. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाचा फॉर्म्यूला स्वीकारावा, अन् महायुतीमध्ये यावे…

ऋतुराज सुरुवातीपासून या अकादमीत सराव करत होता. आज त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अकादमी उभारण्यापूर्वी त्या जागेचा वापर स्थानिक रहिवासी प्रातःविधीसाठी करीत होते. म्हणून अकादमी सुरू झाल्यानंतर तेथे कोण खेळायला येणार अशी चर्चा होती.  पण, आज त्याच मैदानावर सराव करणाऱ्या ऋतुराजचा भारतीय संघात समावेश झाला आहे. याचा मला सार्थ अभिमान असून ऋतुराज नक्कीच चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख