सचिन तेंडुलकरने तुकुममध्ये केला पोळा साजरा; युवराजसिंगही येणार ?

क्रिकेटर युवराजसिंग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. त्यांच्या नावाने एक कॉटेज या रिसॉर्टमध्ये आरक्षित केले आहे. मात्र, अद्याप युवराज आला नाही. तो कुटुंबासोबत ताडोबाच्या वाघांच्या दर्शनाला कधी येईल, हे अनिश्चित आहे. रिसॉर्ट प्रशासनाकडून याविषयी गुप्तता पाळण्यात येत आहे.
Sachin Tendulkar at Tadoba
Sachin Tendulkar at Tadoba

चिमूर (जि. चंद्रपूर) ः मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव अशी ख्याती मिळविलेला सचिन तेंडुलकर Master blaster and The God of Cricket Sachin Tendulkar विदर्भात अधूनमधून जंगल सफारीसाठी येत असतो. विदर्भातील जंगलांनी त्याला जणू भुरळच घातली आहे. दोन दिवसांआधी तो विदर्भात आला आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी करीत आहे. अद्याप त्याला वाघाने दर्शन दिलेले नाही, पण काल त्याने रिसॉर्टवरील कर्मचाऱ्यांसोबत पोळा सण साजरा केला. सचिन पाठोपाठ क्रिकेटपटू युवराजसिंह After Sachin Yuvraj Singh देखील ताडोब्याला येणार असल्याची माहिती आहे. 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीकरिता आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काल सोमवारी बैलजोडीची पूजा केली. तीन दिवसांच्या जंगल सफारीत अद्याप त्याला वाघ दिसलेला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी डॉ. अंजली आणि काही मित्रांसोबत शनिवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आला. येथील एका रिसॉर्टमध्ये तो मुक्कामी आहे. काल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तथा ग्रामीण नागरिकांचा मुख्य सण म्हणजे बैलपोळा होता. यानिमित्ताने रिसॉर्ट प्रशासनाने तुकूम येथील दोन शेतकऱ्यांना जोड्या आणायला सांगितल्या. त्या बैलजोड्यांची पूजा सचिनने केली. त्यानंतर सचिन मदनापूर बफर क्षेत्रात सफारीकरिता रवाना झाला.

ही बातमी वाचा ः करपेंच्या ‘टायगर जिंदा है’ला सिंहाने दिले हे उत्तर...
 
सचिन तेंडुलकर तिसऱ्यांदा ताडोबातील वाघांच्या भेटीला आला. मदनापूर, अलीझंजा, सिरकाळा बफर क्षेत्रात सफारी केली. मात्र, अद्याप वाघाचे दर्शन झाले नाही. आज पोळा असल्याने सचिनने रिसॉर्ट प्रशासनाला पूजेसाठी बैलजोड्या आणाव्या, अशी विनंती केली. त्यानंतर तुकूम येथील विनोद निखारे, तेजराम खिरटकर या दोन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या रिसॉर्टवर बोलाविण्यात आल्या. दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास सचिन तेंडुलकरने बैलजोड्यांची पूजा केली. सचिन तेंडुलकर यांनी बैलांची पूजा करून शेतकऱ्यांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांचा टोपी आणी दुपट्टा देऊन सत्कार केला. त्यांना भोजारा दिला. 

युवराजसिंगही येणार 
क्रिकेटर युवराजसिंग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. त्यांच्या नावाने एक कॉटेज या रिसॉर्टमध्ये आरक्षित केले आहे. मात्र, अद्याप युवराज आला नाही. तो कुटुंबासोबत ताडोबाच्या वाघांच्या दर्शनाला कधी येईल, हे अनिश्चित आहे. रिसॉर्ट प्रशासनाकडून याविषयी गुप्तता पाळण्यात येत आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com