राम खांडेकर विश्‍वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी - ram khandekar was faithful and honest personality said nitin gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राम खांडेकर विश्‍वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

उच्च पदावर काम करीत असताना अत्यंत साधेपणा, नम्रता आणि शालीनता त्यांनी कधीही सोडली नाही. स्व. नरसिंहराव यांचे ते अत्यंत विश्वासू होते. केंद्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते.

नागपूर : दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव The late Prime Minister P.V. Narsing Rao यांचे विश्‍वासू सहकारी, त्यांचे स्वीय साहाय्यक राम खांडेकर Ram Khandekar यांचे दीर्घ आजाराने येथे त्यांच्या घरी काल रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राम खांडेकर हे विश्वासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते, faithful and honest personality अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी राम खांडेकर यांच्या निधनावर आपल्या भावना केल्या आहेत.

उच्च पदावर काम करीत असताना अत्यंत साधेपणा, नम्रता आणि शालीनता त्यांनी कधीही सोडली नाही. स्व. नरसिंहराव यांचे ते अत्यंत विश्वासू होते. केंद्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे मोठ्या कालखंडाचा साक्षीदार गेला, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान कार्यालयातील अनुभवावर त्यांनी ‘सत्तेच्या पडछायेत’ हे पुस्तक लिहिले होते. त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही काम केले आहे. 

रामभाऊ खांडेकर यांच्या निधनाने एक निःस्पृह व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस
रामभाऊ खांडेकर यांच्या निधनाने कर्तव्यदक्ष आणि निःस्पृह अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव साठे आणि स्व. नरसिंहराव अशा अनेक नेत्यांचे संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. या संपूर्ण कालखंडातील अनुभवांचा समृद्ध ठेवा त्यांनी लेखनरूपाने आपल्याला दिला. त्यांच्याशी माझाही व्यक्तिगत स्नेह होता. त्यांच्या निधनाने एका निःस्पृह व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : नीळकंठरावांच्या प्रवेशाने पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल : ईश्‍वर बाळबुधे  

व्यापक जनसंपर्क आणि समृद्ध अनुभवातून रामभाऊ हे त्या-त्या काळातील नेत्यांचे सल्लागार बनले होते. काम करताना आलेले अनुभव त्यांनी पुस्तकांतून, विविध वृत्तपत्रांतील लेखमालांमधून शब्दबद्ध केले. खरे तर त्या कालखंडातील हा एक मोठा इतिहास आणि संदर्भ सांगण्याचे काम त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांचे स्टेनोग्राफर म्हणून ते रुजू झाले. पण, यशवंतरावांनी संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांना दिल्लीत नेले आणि ते त्यांच्या कुटुंबातील जणू एक सदस्य बनले. केवळ चिकाटी, सातत्य आणि कर्तव्यदक्षतेतूनच एक मोठा प्रवास त्यांनी साध्य केला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख