पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नमामी गंगे’ची झाली ‘शवामी गंगे’ : खासदार बाळू धानोरकर

कोरोनाची लढाई ही फक्त भारतीय जनता पक्षाची एकट्याची नाही, तर सर्व देशवासीयांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे, अशी सूचनादेखील महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
Balu Dhanorkar - Narendra Modi
Balu Dhanorkar - Narendra Modi

नागपूर : देशात कोरोनाच्या काळात गंगा नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह (Hundreds of bodies in the river Ganga) वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. २०१४ ला उत्तरप्रदेशमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी (In Uttar Pradesh Narendra Modi) ‘नमामी गंगे’ म्हणत गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु आता मात्र परिस्थिती ‘शवामी गंगे’ अशी झाली आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटून देखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे रूपांतर शवामी गंगेत झाला असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Mp Balu Dhanorkar) यांनी केला आहे. 

खासदार धानोरकर म्हणाले, आज गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून असलेली ही पवित्र नदी आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. पण आज शेकडोंच्या संख्येने मृतदेह या नदीतून वाहत आहेत. या प्रकारामुळे भारताची मान शरमेनं खाली गेली आहे आहे. हा संपूर्ण भारतवासीयांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोनावर मात करण्याच्या या लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांचाही विचार केला पाहिजे. 

२०१४ मध्ये भारतातील प्रदूषित गंगा नदी आपण स्वच्छ करू त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगे असा कार्यक्रम राबविला. २०१५ मध्ये भाजप सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींच्या वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे. गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झाशी, कानपूर या शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करून सांगितला जातोय. 

उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य होत चाललं आहे. त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घेतल्या पाहिजे. कोरोनाची लढाई ही फक्त भारतीय जनता पक्षाची एकट्याची नाही, तर सर्व देशवासीयांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे, अशी सूचनादेखील महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com