केंद्र सरकारने दिलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठरले शोभेची वस्तू...

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात दिवसाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची संख्या होती.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर :  कोरोनाच्या काळात केंद्रातील भाजप सरकारने ज्या राज्यांत त्यांची सरकार नाही, त्या राज्यांवर अन्याय केला. भाजपशासीत राज्यांत कोरोनाच्या मृतांचे आकडे कमी दाखवण्यात आले. केंद्राने दिलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तर केवळ शोभेची वस्तू ठरले, असे म्हणत कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. Congress MP Balu Dhanorkar targated the modi government. 

कोरोनाचे जागतिक वैश्विक संकट आले होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या होती. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांनी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या कमी दाखविली तसेच केंद्र सरकारने दिलेले 5 लीटरचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही शोभेची वस्तू ठरली असून, केंद्राने कोरोना काळात भाजप विरहित राज्यांसोबत दुजाभाव केला असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी AICC संशोधन विभागाद्वारे COVID-19 हेल्थ इन इंडिया या विषयाच्या चर्चा सत्रात केला. 

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात देशात केंद्र सरकारच्या नियोजनाच्या अभाव असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गंभीर संकटात अनेक राज्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळाले नाहीत. त्यासोबतच या काळात केंद्र सरकारचे लक्ष फक्त निवडणुकीत असल्याचे दिसून आले होते. या काळात कोरोनावर मात करण्याकडे लक्ष न देता मध्यप्रदेश येथील काँग्रेसची सत्ता त्यांना पाडायची होती. त्यासोबतच या काळात पश्चिम बंगालमध्येही निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे या काळात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. 

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात दिवसाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची संख्या होती. या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील आकडे मोठ्या प्रमाणात मृत्यू पावले असल्याचे आहेत. या दोन्ही आकड्यांत फरक असल्याचे दिसून येत आहे. तरी देखील या राज्यांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com