नितीन राऊत राहुल गांधींकडे करणार नाना पटोलेंची तक्रार... ?

महाविकास आघाडीत ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेचे अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडेच राहणार आहे. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांना अध्यक्षपदी विराजमान करून ऊर्जा खाते पटोलेंना द्यावे.
Nana Patole - Rahul Gandhi - Nitin Raut.
Nana Patole - Rahul Gandhi - Nitin Raut.

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत Energy Minister Dr. Nitin Raut यांच्यातील वाद तसुभरही कमी झाला नाही, हे काल नागपुरातील कॉंग्रेसच्या सायकल मोर्चामध्ये दिसून आले. त्यानंतर हा वाद आणखी पेटणार अशी चिन्हे दिसू लागली होतीच आणि आज सकाळीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat आणि नितीन राऊत दिल्लीत दाखल झाले. 

दिल्लीमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन राऊत - पटोले वाद त्यांच्या कानावर घालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयावरून पटोले आणि राऊत यांचा वाद सुरू असल्याचे सर्वश्रुतच आहे. पण यामध्ये बाळासाहेब थोरात डॉ. राऊत यांच्यासोबत दिल्लीत दाखल झाल्याने विविध चर्चांनी जोर पकडला आहे. आज जरी कॉंग्रेसचे हे नेते दिल्लीत दाखल झाले, तरी या वादाचा निकाल तात्काळ लागेल, असे वाटत नाही. आज जर थोरात आणि राऊत यांची वरिष्ठ नेत्यांसोबत भेट झालीही, तरी त्यानंतर पटोलेंना दिल्लीत बोलावले जाईल, बैठका होतील आणि शक्य झालेच तर मग काहीतरी तोडगा निघेल. 

नाना पटोले यांनी वर्षभर विधानसभा अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केल्यानंतर पक्षसंघटनेत काम करण्यात रुची दाखवली. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद सांभाळण्याची सूचना श्रेष्ठींनी केली. ती मान्य करत त्यांनी सोबत मंत्रिपदही द्यावे अशी मागणी केली आणि त्यातही ऊर्जा खात्यात रस दाखवला. तेव्हापासूनच ऊर्जामंत्री राऊत आणि नाना पटोले यांच्या बिनसले. तेव्हापासून कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रम आणि मोर्चात हा वाद चव्हाट्यावर आला. आज ना उद्या याचा स्फोट होईल, असे वाटत असतानाच कालच्या नागपुरातील मोर्चानंतर आज पटोलेंची तक्रार करण्यासाठी राऊत आणि थोरात दिल्लीत पोहोचले. 

अध्यक्षपदाच्या निवडीवरूनही आहेत वाद…
महाविकास आघाडीत ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेचे अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडेच राहणार आहे. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांना अध्यक्षपदी विराजमान करून ऊर्जा खाते पटोलेंना द्यावे, या मताचा एक वर्ग कॉंग्रेसमध्ये तयार झाला होता. तेव्हाच राज्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते. ते पटोले आणि राऊत यांच्या रूपाने पडलेही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड व्हायला पाहिजे होती. राज्यपालांनी तसे पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले होते. पण दोन दिवसीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंतही कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे या वादाने आणखी उग्र रूप धारण केल्याचेही सूत्र सांगतात. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com