नितीन गडकरींनी स्वतः सांगितले की, त्याला लाथ का मारली होती...

मी पालकमंत्री असताना शुक्रवारी तलावाचे रेलिंग बांधले होते, ते आता सडले. तेव्हा माझी एक चूक झाली होती. ती म्हणजे त्याचा गेज नाही मोजला.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : मी पालकमंत्री असताना When I was Guardian Minister of Nagpur आपल्या कार्यालयासमोर एक मुलगा शुक्रवारी तलावात लघुशंका करीत होता. पोलिसांसहित माझा कॅनव्हा तेथून चालला होता. मी तो थांबवला, गाडीतून उतरलो आणि त्या मुलाच्या मागून जाऊन त्याला ‘मागे’च जोरदार लाथ मारली. अन् तो आडवा पडला. कारण या शहराच्या स्वच्छतेशी माझी कटीबद्धता तेव्हाही होती, आजही आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. Union Minister Nitin Gadkari.

‘मी त्याला लाथ मारली होती’, असे वक्तव्य असलेला गडकरींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. शहरातील सोनेगाव तलावाच्या सौदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, एक घटना माझ्या आयुष्यात घडली. ती येथे सांगावी की सांगू नये, याचा विचार करतोय. पण आता सांगूनच टाकतो, मला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी एका मुलाला लाथ मारल्याची घटना सांगून शहराच्या स्वच्छतेप्रति ते कटिबद्ध आहेत, हे सांगितले. सोनेगाव तलावाचे काम आपण करत आहोत. पण हा तलाव शुद्ध आणि स्वच्छ राहील, हे पाहणे तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. 

हा धंदा नाही चालणार...
या तलावात कोणते गणपती शिरवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. तलाव शुद्ध व स्वच्छ राहिला पाहिजे. येथे सर्व पक्षी आले पाहिजे, पर्यावरणाचे संतुलन कायम राहिले पाहिजे. लोकांना आनंद मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही चांगल्या वस्तू बांधत राहायचे आणि तुम्ही त्यावर कचरा टाकत रहायचा, हा धंदा आता नाही चालणार, असे गडकरींना नागपूरकरांना बजावले. तलावात जर कचरा टाकला आणि अनावश्‍यक झाडे पुन्हा उगवली, तर आमच्याकडे पुन्हा सौदर्यीकरणासाठी पैसे मागायला येऊ नका, असेही त्यांना बजावले. 

तेव्हा माझी चूक झाली होती...
आता मिळालेल्या पैशांतून हा तलाव चांगला झाला आहे, याचे मालक तुम्ही आहात आणि हा सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. मी पालकमंत्री असताना शुक्रवारी तलावाचे रेलिंग बांधले होते, ते आता सडले. तेव्हा माझी एक चूक झाली होती. ती म्हणजे त्याचा गेज नाही मोजला. महानगरपालिकेला त्याचे काम दिले होते. शशी प्रभूंनी त्याचे डिझाईन तयार केले होते. तेव्हा त्या ठेकेदाराने हरामखोरी केली, पाइपचा गेज पतला वापरला म्हणून ते सडले. आता या कामात तसे होऊ नये. नाहीतर गेज मोजायला मी स्वतः जाईल आणि बोगसपणा दिसला तर ठेकेदाराला चांगलाच बडवीन, असा इशारा गडकरींनी दिला.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com