नाना पटोले म्हणाले, महागाई हीच मोदी सरकारची डार्लिंग…

काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरू आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करून देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरू आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरून जनतेत प्रचंड आक्रोश आहे,
Nana Patole - Narendra Modi
Nana Patole - Narendra Modi

मुंबई : केंद्रातील मोदी सरकार Modi Government सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करून केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. State President of Congress Nana Patole. 

महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर १९० रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी ४४० रुपये असणारा हाच एलपीजीगॅस आता ९०० रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसीन बंद केले आणि आता गॅस ९०० रुपयांपर्यंत महाग केला, एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनतेला परवडणारा नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या ८ महिन्यात केंद्र सरकारने ६७ वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल १०७ रुपये, डिझेल ९६ रुपये लीटर असून गॅसच्या किमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररूपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहोचू नये, यासाठी इंधन व गॅसवर सबसिडीच्या रूपाने मदत दिली जात होती. ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. युपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे. २०१४ साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करून ठेवले आहे. 

काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरू आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करून देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरू आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरून जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता भाजप व मोदींना त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com