पटोले म्हणाले, खरं तर मोदींनीच राजीनामा द्यायला पाहिजे होता…

मोदींनी नारायण राणे यांना मंत्रिपद दिले. ते सध्या फार खूष दिसत आहेत. पण त्यांना माहिती नाही की सर्व मंत्रालयांचा कारभार पीएमओमधूनच चालतो. आता नारायण राणेंना कळेल की, मंत्री ते काय अजून कुणीही असले तरी काहीही फरक पडत नाही.
Nana Patole - Narendra Modi
Nana Patole - Narendra Modi

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन दिले गेले आहे. आतापर्यंत चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवण्यात आले आहे. १२ मंत्र्यांचा राजीनामा घेण्याऐवजी नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, in fact modi should have resigned  अशी जळजळीत टिका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले State President of Congress Nana Patole यांनी केली.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आज नाना पटोले यांच्या नेतृत्वात सायकल मोर्चा काढून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. यावेळी पटोले माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ज्या लोकांनी देश डुबवण्याचे काम केले, त्यांना मोदींनी प्रमोशन दिले आणि संजय धोत्रेंसारख्या चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवण्यात आले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले. खरे तर चुकांची कबुली देऊन परिस्थितीत सुधार आणण्याचे काम करायला पाहिजे होते. देश रसातळाला नेल्याबद्दल मोदींनीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला. 

आज शहरातील संविधान चौकातून पटोलेंच्या नेतृत्वात सायकल रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीमध्ये नाना पटोले यांच्यासह पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री अनिस अहमद, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, तानाजी वनवे, यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महागाईचा निषेध करत कॉंग्रेस नेत्यांना केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टिका केली. आज सकाळपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कॉंग्रेसचे आजचे आंदोलन होईल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी भर पावसात सायकली चालवत महागाईचा विरोध केला. संविधान चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. 

भिती दाखवून शेकतात राजकीय पोळ्या..
ईडी आणि सीबीआय कारवाईचा धाक दाखवून आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. एकनाथ खडसेंसारख्या नेत्यांना नोटीस येणे ही बाब आता काही नवीन राहिली नाही. केंद्र सरकार ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा धाक संपण्याची भीती पटोले यांनी व्यक्त केली. 

नारायण राणेंना आता कळेल..
मोदींनी नारायण राणे यांना मंत्रिपद दिले. ते सध्या फार खूष दिसत आहेत. पण त्यांना माहिती नाही की सर्व मंत्रालयांचा कारभार पीएमओमधूनच चालतो. आता नारायण राणेंना कळेल की, मंत्री ते काय अजून कुणीही असले तरी काहीही फरक पडत नाही. काय करायचे आणि कुणी करायचे आहे, हे त्यांचे आधीच ठरलेले असते, असेही नाना पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com