मोदींनी गॅस दिला, अन् रॉकेल बंद केले; आज रॉकेल नाही, गॅसही नाही...

केंद्र सरकार ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महागाई निर्माण करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस उद्यापासून १७ जुलैपर्यंत निषेध आंदोलन करणार आहे.
Nana Patole - Narendra Modi
Nana Patole - Narendra Modi

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Prime Minister Narendra Modi उज्वला योजनेअंतर्गत गरिबांना गॅस दिला, अन् रॉकेल बंद केले. आज रॉकेल नाही अन् महाग झाल्यामुळे गॅसही नाही. सरकार हे नफा कमवण्यासाठी नसते, तर जनतेची काळजी घेण्यासाठी असते. ही बाब भाजपच्या मोदी सरकारला माहितीच नाही. Modi Government do not know त्यामुळे हे लोक गेल्या सात वर्षांपासून फक्त एन्जॉय करीत आहेत. They are enjoying since last seven years या महागाई सरकारच्या विरोधात कॉंग्रेस उद्यापासून १० दिवस आंदोलन करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole म्हणाले.  

याबाबत माहिती देताना पटोले म्हणाले, केंद्र सरकार ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महागाई निर्माण करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस उद्यापासून १७ जुलैपर्यंत निषेध आंदोलन करणार आहे. अत्याचारी, जुलमी व्यवस्थेच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे. आधी मोदी सरकारने उज्वला गॅसचे प्रलोभन दिले. मोफत देऊ असे सांगितले, गॅस गरिबांच्या घरी पोहोचवला आणि रॉकेल बंद केले. आज रॉकेलही नाही महागल्यामुळे गॅसही घेऊ शकत नाही. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पाप मोदींनी केले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या बाबतीतही तेच आहे. 

शेजारच्या देशांना आपला देश पेट्रोल आणि डिझेल देत आहे. त्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भुतान या देशांना आपला देश ३० रुपये प्रतिलीटर पेट्रोल आणि २२ रुपये प्रतिलीटर डिझेल विकत आहे. आपल्या देशातील नागरिकांना मात्र १०६ रुपये लीटर भावाने पेट्रोल विकून, त्यांना लुटून बरबाद करण्याचे पाप केंद्रातील भाजपचे मोदी सरकार करत आहे. या दरवाढीमुळे इतर वस्तुंचेही दर आकाशाला भिडले आहेत. वाहतूक खर्च वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. ही कृत्रिम महागाई आहे. येणारे १० दिवस म्हणजे १७ जुलैपर्यंत राज्यभर कॉंग्रेसच्या विविध संघटनांद्वारे निषेध आंदोलन केले जाणार असल्याचे नाना म्हणाले.  

उद्या सायकलवर...
उद्या मी स्वतः नागपुरात सायकल मोर्चा काढून आंदोलनाची सुरुवात करणार आहे. प्रत्येक विभागात आमचे कार्याध्यक्ष आणि इतर पदाधिकारी सायकली चालवून आंदोलन करणार आहेत. ९ जुलैला महिला कॉंग्रेसतर्फे मोर्चे काढून महागाईचा निषेध केला जाईल. त्यानंतर युवक कॉंग्रेस आणि त्यानंतर आमच्या विविध संघटना १७ जुलैपर्यंत ही मालिका सुरू ठेवणार आहे. सर्व आंदोलनादरम्यान कोविडच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचेही पटोले म्हणाले.  

मोदी सरकार एन्जॉय करत आहे...
सरकार नफा कमावण्यासाठी नव्हे, तर जनतेची काळजी घेण्यासाठी असते. नेमके हेच मोदी सरकारला माहिती नाही. केवळ मूठभर लोकांच्या भल्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. त्यामुळे आज जनतेचे हाल सुरू आहेत. गेल्या सात वर्षांपासून मोदी सरकार फक्त एन्जॉय करीत आहे. जरी मंत्रिमंडळाचा विस्तार केला, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण पीएमओतून सर्व कामे केली जातात. मंत्र्यांना त्यांनी कामच शिल्लक ठेवले नसल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला. 

दिलीप कुमार यांनी नवे आयाम स्थापित केले..
सिनेसृष्टीला आणि सोबतच समाजालाही दिशा देण्याचे कार्य अभिनेते दिलीप कुमार यांनी केले. ते एक महान कलाकार होते. सिनेसृष्टीत नवे आयाम त्यांनी स्थापित केले. चांगल्या कलावंताला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत नाना पटोले यांनी अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com