देश चालवता येत नसेल, तर मोदी सरकारने चालते व्हावे : खासदार बाळू धानोरकर - if the country can not be run then modi government should be go | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

देश चालवता येत नसेल, तर मोदी सरकारने चालते व्हावे : खासदार बाळू धानोरकर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करून टाकला आहे.

चंद्रपूर : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावरच आले आहे. Diesel is on the verge of reaching 100 घरगुती वापराचा गॅस ९०० रुपये झाला आहे. देशाचा जीडीपी बांग्लादेशापेक्षाही खाली घसरला आहे. The country's GDP has fallen even lower than that of Bangladesh देशात महागाई वाढीला मोदी सरकार Modi Government जबाबदार आहे. देश चालविता येत नसेल, तर मोदी सरकारने चालते व्हावे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी दिला. 

चंद्रपूर शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे आज आदर्श पेट्रोल पंपवर पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, आधीच कोरोनाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागतो आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर परिणाम होऊ दिला नाही. सामान्य माणसांना दिलासा देण्याचीच भूमिका तत्कालीन सरकारने घेतली होती. मात्र, आताचे मोदी सरकार सामान्य जनतेच्या जिवावर उठले आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करून टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले. त्याची पुरती वाताहत लावून देश रसातळाला नेला. मोदींच्या सात वर्षातील या काळ्या कारभाराचा आज निषेध करण्यात आला. वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करू शकले नाहीत, अशा घणाघातही खासदार धानोरकर यांनी केला. 

जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वातील आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला कॉंग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सुनीता लोढ़िया, नगरसेवक प्रदीप डे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, नगरसेविका ललीता रेवल्लीवार, महिला शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष शालिनी भगत, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नरेंद्र बोबड़े, गोपाल अमृतकर, युवक कॉंग्रेसप्रदेश सचिव सचिन कत्याल, एनएसयुआय प्रदेश महासचिवकुणाल चहारे, माजी नगरसेवक राजेश अडूर, इंटक युथ जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, उमाकांत धांडे, सुलेमान अली, मोहन डोंगरे, रुचित दवे, चंद्रमा यादव, नौशाद शेख, विजय धोबे, प्रवीण दाहूले, मनीष तिवारी, योगानंद चंदनवार, प्रीतिसा शाह, रामकृष्णा, मनोज खांडेकर, संदीप सिडाम, सुरेश खापने, पप्पूभैय्या सिद्दीकी, मुन्ना बुरड़कर, इरफान शेख, सलीम भाई, कासिफ अली, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कृणाल रामटेके, राजू त्रिवेदी, राजू वासेकर, वायफडे गुरुजी, प्रकाश देशभ्रतार, रुषभ दुपारे, राजेश रेवल्लीवार, अंकुर तिवारी, सूर्य अडबाले, अ‍ॅड. वाणी दारला, शीतल काटकर, संध्या  पिंपळकर, कल्पना गिरड़कर, स्वाती त्रिवेदी, चोपकर ताई, मंदाताई सोयाम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख