Hemant Biswa Sarma
Hemant Biswa Sarma

हेमंत विश्व सरमा यांनी सरसंघचालकांना सांगितली आसाममधील आव्हाने...

हेमंत विश्व सरमा यांनी दुसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसामच्या बागपत जिल्ह्यातील जालुकबारी विधानसभेतून सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत.

नागपूर : आसाममधील सद्यःस्थिती आणि भविष्यातील आव्हाने, यांबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरसंघचालकांसोबत एका तासाहून अधिक वेळ चर्चा केली. नेमकी काय चर्चा झाला, याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हेमंत विश्व सरमा यांचा हा पहिलाच नागपूर दौरा होता. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री हेमंत विश्व सरमा शुक्रवारी सकाळी ११ वाजताच नागपूरला येणार होते. परंतु, काही महत्त्वाच्या कामांमुळे त्यांना उशीर झाला. त्यामुळे निर्धारित कार्यक्रमात बदल करत ते दुपारी ३.३० वाजता नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी थेट महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. दुपारी ४.१४ वाजता मुख्यालयात गेलेले हेमंत विश्व सरमा यांनी सरसंघचालकांचा आशीर्वाद घेतला. 

या भेटी संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सरमा यांनी सरसंघचालकांशी आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आसामची सद्य परिस्थिती आणि संभाव्य आव्हाने याबाबत सरसंघचालकांना माहिती दिली. या भेटीनंतर सरमा संध्याकाळी ५.३५ वाजता संघ मुख्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात जाऊन त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले.

आसामच्या राजकारणावर मजबूत पकड
हेमंत विश्व सरमा यांनी २०१५ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपात प्रवेश घेतला. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली. यापूर्वी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे २०१६ च्या विधानसभा निकालानंतर हेमंत विश्व सरमा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत होते. मात्र सर्बानंद सोनोवाल यांची निवड करण्यात आली होती. 

तेव्हा सोनवाल यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी सीएए आणि कोरोना स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हेमंत विश्व सरमा यांनी दुसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसामच्या बागपत जिल्ह्यातील जालुकबारी विधानसभेतून सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हेमंत विश्व सरमा यांनी काँग्रेसच्या रामेन चंद्र बोरठाकुर यांच्यापेक्षा १ लाख १ हजार ९११ मते अधिक मिळवत विजय मिळवला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com