अमरावतीचे डॉ. संदेश गुल्हाने बनले स्कॉटलॅंडचे खासदार... 

एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.
Sandesh Gulhane
Sandesh Gulhane

अमरावती : कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात प्रवेश करून पहिल्याच प्रयत्नात खासदार होणे सोपे नव्हे Becoming an MP on the first try is not easy आणि ते सुद्धा भारताच्या संसदेत नव्हे तर चक्क स्कॉटलॅंडच्या संसदेत. Scottish  Parliament  पण हा चमत्कार करून दाखवलाय अमरावतीचे डॉ, संदेश गुल्हाने Dr. Sandesh Gulhane यांनी. डॉ. संदेश यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे भारतीय वंशाचे ते पहिले खासदार He was the first MP of Indian descent आहेत. 

डॉ. संदेश सध्या स्कॉटलँड येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ. गुल्हाने यांच्या यशाने अमरावतीसह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. संदेश गुल्हाने यांच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील भाजीबाजार परिसरातील रहिवासी प्रकाश व पुष्पा गुल्हाने यांचा एकुलता एक मुलगा संदेश गुल्हाने. त्यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्‍टर असलेले संदेश गुल्हाने यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रांत कार्य करीत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. डॉ. संदेश यांना स्कॉटलँडच्या संसदीय निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली गेली. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. स्कॉटलँडमध्ये निवडून गेलेल्या भारतीय वंशाचे ते पहिले पुरुष आहेत. 

डॉ. गुल्हाने यांनी कोविड फ्रंटलाइनर म्हणून काम केल्यानंतर होलीरूड निवडणुकीत टॉरीजसाठी उभे राहण्याचे त्यांनी ठरविले. ग्लासगो आणि आसपासच्या भागात शस्त्रक्रियांमध्ये काम करणारे गुल्हाने हे ग्लासगो क्षेत्राच्या टोरी यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते एसएनपीचे न्याय सचिव हमजा युसूफच्या विरोधातही पोलॉकमध्ये उभे होते. डॉ. गुल्हाने यांचे वडील प्रकाश गुल्हाने लंडन येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्य करीत होते. ८ मे रोजी डॉ. गुल्हाने स्कॉटिश संसदेत निवडून आल्याची माहिती मिळताच आमचा आनंद द्विगुणित झाला, असे अमरावतीमधील त्यांचे नातलग तसेच परिचितांनी सांगितले. 

एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे, असे मनोगत डॉ. संदेश यांच्या मित्रपरिवाराकडून व्यक्त करण्यात आले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com