दिवाळीच्या धामधुमीत घातपाताचा कट दिल्ली पोलीसांनी उधळला.. - delhi police foils plot to assassinate on diwali | Politics Marathi News - Sarkarnama

दिवाळीच्या धामधुमीत घातपाताचा कट दिल्ली पोलीसांनी उधळला..

पीटीआय
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

दोघेही विशीतील तरूण आहेत. कडक बंदोबस्त असल्याने त्यांना दिवाळीच्या काळात घातपाताची कारवाई करणे जमले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत मोठा हल्ला करून नेपाळमार्गे पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्याने दिल्लीकरांवरील मोठे संकट टळले आहे.

नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या धामधुमीत दिल्लीत मोठा घातपात घडविण्याचे मनसुबे दिल्ली पोलिसांनी उधळून लावताना जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून २ पिस्तूल आणि १० काडतुसे जप्त केली आहेत. 

दोन अतिरेकी कारने जात असल्याची गुप्त माहिती दिल्ली पोलीस विभागाच्या स्पेशल सेलचे डीसीपी संजीव यादव यांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी सराई कालेखान या भागातील मिलेनियम पार्कजवळ पोलिसांनी सापळा रचला. काश्मीरमधील रहिवासी असलेले हे दोन अतिरेकी येताच पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडले. अतिरेक्यांना प्रतिकाराची संधीही पोलिसांनी दिली नाही. अब्दुल लतीफ मीर हा काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला तर मोहम्मद अश्रफ हा कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

हे दोघेही विशीतील तरूण आहेत. कडक बंदोबस्त असल्याने त्यांना दिवाळीच्या काळात घातपाताची कारवाई करणे जमले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत मोठा हल्ला करून नेपाळमार्गे पळून जाण्याचा त्यांचा डाव होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्याने दिल्लीकरांवरील मोठे संकट टळले आहे. या दोघांनी उत्तर प्रदेशातील देवबंद येथेही भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडे दिल्लीतील भागाचे नकाशे, ५१ हजार रुपये आणि धार्मिक प्रचाराचे साहित्यही आढळून आले आहे.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख