सोमवारपासून भाजप राबविणार ‘हे’ महत्वाचे चार कार्यक्रम…

देशात अभिनव पद्धतीने होणारे वृक्षारोपण, किल्‍लेसफाई,आदिवासी विद्यार्थ्‍यांनी केलेली एव्‍हरेस्‍टची यशस्‍वी चढाई, अशा विविध घटनांची नोंद पंतप्रधान घेतात.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra यांच्या ७८ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासह भाजप BJP चार महत्वाचे कार्यक्रम राबविणार आहे. Will implement four important programe सोमवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस, २३ जून रोजी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी Dr. Shyamaprasad Mukharji यांचा स्मृतिदिवस आणि २५ जून रोजी आणीबाणी विरोधी काळा दिवस पाळला जाणार आहे. चंद्रपूर जिल्‍हयात ग्रामीण भागात तसेच महानगरात हे कार्यक्रम यशस्‍वीपणे राबवावे, These programs should be implemented successfully असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी केले.

मुनगंटीवार म्हणाले, हे चारही कार्यक्रम या देशाच्‍या अस्मितेशी, इतिहासाशी संबंधित आहेत. २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिवस आपण साजरा करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्‍त राष्‍ट्रसंघात २१ जून हा दिवस आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला. ५ हजार वर्षांची परंपरा योगाला आहे. श्रीमदभगवतगीतेमध्‍ये भगवान श्रीकृष्‍णाने योगाचे महत्‍व विषद केले. संयुक्‍त राष्‍ट्र संघात १७५ देशांनी मोदींच्या या प्रस्‍तावाला अनुमोदन दिले. पहिल्‍या वेळी १५० पेक्षा जास्‍त देशात योगदिन साजरा झाला. २१ जून हा मोठा दिवस आहे. या दिवशी उत्‍तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे योग दिनाला विशेष महत्व असल्याचे ते म्हणाले.

देश में दो विधान, दो निशाण व दो प्रधान नही चलेंगे, असा नारा देणारे प्रखर राष्‍ट्रभक्‍त डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जून रोजी आहे. काश्मीरसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या सच्च्या देशभक्‍ताला पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० रद्द करून खरीखुरी आदरांजली वाहिली आहे. ‘जहा हुये शहीद मुखर्जी, वह काश्मीर हमारा है’ असा नारा आम्‍ही द्यायचो. त्‍यांच्‍या स्‍मृतीला आदरांजली आपल्‍याला अर्पण करायची आहे. २५ जून रोजी इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू करत लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली होती. विश्‍वरत्‍न बाबासाहेब आंबेडकरांच्‍या घटनेचा अवमान केला होता. इंदिरा गांधींनी सत्‍तेचा, पदाचा दुरुपयोग केला होता. या देशाने पापाचा महासागर आणीबाणीत अनुभवला. न्‍याय व्‍यवस्‍थेने इंदिरा गांधींना फटकारले व पुढील लोकसभा निवडणुकीत त्‍यांच्यासह कॉंग्रेसला नाकारले. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्‍हणून पाळत असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधण्‍यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला. आजवर ७७ कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी भारतवासीयांशी  संवाद साधला आहे. देशात अभिनव पद्धतीने होणारे वृक्षारोपण, किल्‍लेसफाई,आदिवासी विद्यार्थ्‍यांनी केलेली एव्‍हरेस्‍टची यशस्‍वी चढाई, अशा विविध घटनांची नोंद पंतप्रधान घेतात. २७ जून रोजी मन की बात चा ७८ वा कार्यक्रम आहे. या दिवशी मन की बातचे प्रसारण गावागावांत, शहरात सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातील, त्‍यात सर्वपक्षीय नागरिकांना, गोरगरीब जनतेला सहभागी करून आहोत, असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमांच्या निजोयनासाठी झालेल्या बैठकीला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्‍हेरी, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष, हरिश शर्मा, भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा नेते प्रमोद कडू, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सदस्‍य अंजली घोटेकर, जिल्‍हा महिला आघाडी अध्‍यक्ष अल्‍का आत्राम, जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहूले, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो ग्रामीण अध्‍यक्ष आशिष देवतळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभुषण पाझारे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com