अभिनय सम्राट दिलीपकुमार १९७३ मध्ये ‘यासाठी’ आले होते नागपुरात... - acting emperor dilip kumar had come to nagpur for this program | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनय सम्राट दिलीपकुमार १९७३ मध्ये ‘यासाठी’ आले होते नागपुरात...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

एन. के. पी. साळवे यांच्या घरी ते नेहमीच येत. नागपूरचे ख्यातनाम शायर डॉ. मंशा उर रहमान यांच्या सन्मानार्थ आयोजित ‘जश्न ए मंशा’ हा त्यांच्या गजल गायनाच्या कार्यक्रमालाही दिलीपकुमार आले असल्याची नागपूरकरांची आठवण ताजी आहे.

नागपूर : वर्धा मार्गावर असलेल्या साई मंदिराला Sai Mandir on wardha road गानकोकिळा लता मंगेशकर Lata Mangeshkar यांच्यापासून ते धर्मेंद्र हेमा मालिनीपर्यंत Dharmendra and Hema Malini अनेक कलावंतांनी आजपर्यंत भेटी दिल्या आहेत. परंतु अभिनय सम्राट दिलीपकुमार Acting Emperor यांची भेट आजही लोकांच्या स्मरणात आहे. साई मंदिरासाठी जमीन खरेदीसाठी आयोजित मदत निधी संकलन कार्यक्रमात दिलीपकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, अशी आठवण ख्यातनाम निवेदक किशन शर्मा Kishan Sharma यांनी सांगितली. शर्मा हे त्या कार्यक्रमाचे निवेदक होते.

नागपुरात साई मंदिरासाठी जमीन खरेदीसाठी पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सन १९७३ - ७४ मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिलीपकुमार प्रमुख पाहुणे होते. त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी फर्मास भाषण केले. ते पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत थांबले. एवढेच नव्हे तर यावेळी स्थानिक गायक वादक कलाकारांची नावे लिहून घेत आवर्जून त्यांचे कौतुक केल्याची आठवणही किशन शर्मा सांगतात. एन. के. पी. साळवे यांच्या घरी ते नेहमीच येत. नागपूरचे ख्यातनाम शायर डॉ. मंशा उर रहमान यांच्या सन्मानार्थ आयोजित ‘जश्न ए मंशा’ हा त्यांच्या गजल गायनाच्या कार्यक्रमालाही दिलीपकुमार आले असल्याची नागपूरकरांची आठवण ताजी आहे.

ट्रॅजेडी किंग व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज सकाळी मुंबईत हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. हे दिलीप कुमार अर्थात युसूफ भाई यांचे कुटुंब मुळचे देवळाली लष्करी कॅन्टोनमेंट येथील रहिवासी आहे. त्यांच्या आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवर खान यांचे ते सुपुत्र होते. त्यांचा जन्म १९२२ मध्ये पेशावर येथे झाला. १९३६ च्या सुमारास ते देवळालीला स्थलांतरित झाले. १९४४ मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देवळाली परिसरात झालेले आहे. त्यात `गंगा जमुना` हा प्रमुख चित्रपट आहे.    

हेसुद्धा वाचा : अकोल्याला पहिल्यांदाच मिळालेला मंत्रि‍पदाचा मान ठरला औटघटकेचा...

दिलीप कुमार यांचे कुटुंब फाळणीपूर्वीच भारतात आले व देवळालीला स्थायिक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी सामरिक सोयीसाठी अफगाणिस्तान- पाकिस्तानच्या सीमेवरील क्वेट्टा येथील आपले तोफखाना केंद्र (सध्याचे स्कूल ऑफ आर्टीलरी) देवळालीला हलवले. आल्हाददायक थंड हवेचे ठिकाण, जंगल व डोंगर यामुळे तोफखान्याचे प्रशिक्षण व सरावासाठी हे गाव त्यांना सोयीचे वाटले. तोफखाना केंद्रामुळे लष्कराचे कॅन्टोनमेंट (छावणी) आली. त्यात लष्कराशी संबंधित अनेक व्यावसायिक आले. त्यात हे खान कुटुंब होते. बालपणी दिलीपकुमार कुंटुबाच्या लष्करी अधिकाऱ्यांना फळे विक्रीच्या व्यवसायात मदत करीत असत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख