काश्मीर घेण्याचे शोएब अख्तर बरळला... त्याला प्रचंड धूतला - shoaib akhatar face criticism on social media for his lunatic claims | Politics Marathi News - Sarkarnama

काश्मीर घेण्याचे शोएब अख्तर बरळला... त्याला प्रचंड धूतला

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

गजवा-ए-हिंदची भाषा त्याने केली...

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू बरळल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून भारताविरोधात धर्मयुद्ध छेडण्याची भाषा करत आधी जम्मू- काश्मीर जिंकू त्यानंतर भारतही बाळकावू, अशी दर्पोक्ती केली आहे.

त्याच्या या मूर्ख दाव्यामुळे तो सोशल मिडियात टिंगलीचा विषय बनला आहे. शोएब अख्तरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात तो गजवा ए हिंद (धर्मयुद्धच्या) बाबत बोलत असल्याचे दिसते.
रावळपिंडी एक्स्प्रेसच्या समा टीव्हीला मुलाखत देताना शोएब अख्तरने सांगितले, प्रथम मुस्लिम काश्मीरमध्ये घुसतील. नंतर भारतभर पसरतील, ही गाजवा ए हिंदची थेअरी आहे. भारताच्या उत्तरी भागात अफगाणिस्तान, पाकिस्तान या प्रांतातून इतिहासात टोळ्यांची घुसखोरी झाली. विशेषतः इस्लामी टोळ्यांनी `गाजवा ए हिंद`द्वारे भारत बाळकावण्याचे स्वप्न पाहिले. आता ते स्वप्न उराशी बाळगून शोएब पुन्हा भारतावर आक्रमण करण्यास मुस्लिमांना छिथावतोय. जैश ए मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेची ही दिवास्वप्ने आहेत. त्यांची तळी तो उचलत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख