`तृणमूल`चा धसका : ममतांचा पराभव करणाऱ्या सुवेंदूंना `झेड` आणि वडिल व भावाला `वाय` सुरक्षा

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या जिवाला भीती...
suvendu adhikari
suvendu adhikari

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (West Bengal election 2021) भडकलेल्या हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचे वडील शिशिर अधिकारी आणि बंधू दिव्येंदू अधिकारी यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तृणमूल काॅंग्रेस (TMC) सोडून भाजपमध्ये (BJP) आलेल्या अनेक नेत्यांना आता केंद्र सरकारच्या यंत्रणांची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. 

देशभराचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. तर, केंद्रातील सत्ताधारी भाजपला ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची करूनही सत्ता मिळवता आली नसली तरी, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत स्थान मिळवले आहे. तर निकालानंतर राजकीय हिंसाचार पेटला आहे. या हिंसाचारात कार्यकर्त्यांवरील तसेच केंद्रीय मंत्र्यांवरील हल्ल्यानंतर भाजपने देशभरात निदर्शने केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला होता. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे लोकसभेतील तर बंधू दिव्येंदू अधिकारी हे राज्यसभेतील खासदार आहेत. पश्चिम बंगालमधील बदलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये नेतेमंडळीना असलेल्या धोक्याचा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृह खात्याने सुरक्षा देऊ केली आहे. दोन्हीही खासदारांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा असेल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार ते पाच सशस्त्र कमांडो त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असतील. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारींना आधीच ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com