अंतर्गत राजकारणामुळेच घेतला संजय धोत्रेंचा राजीनामा...

केंद्र सरकारच्या गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीत ज्या लोकांच्या कामाची काहीच छाप नाही, अशांना मंत्रिपदी बसवण्यात आले आहे. संजय धोत्रे यांना भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे मंत्रिपदावरून काढण्यात आल्याची भावना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
Sanjay Dhotre
Sanjay Dhotre

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेले संजय धोत्रे Sanjay Dhotre यांना केंद्रीय मानव संसाधन व शिक्षण राज्यमंत्री पदावर 19 मे 2019 रोजी नियुक्त करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने BJP त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून जिल्ह्याचा बहुमान वाढविला. परंतु, अवघ्या दोन वर्षांतच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांना काढण्याची कारणे काही विशेष नाहीत, अशी चर्चा आहे. परंतु, त्यांना पदावरून काढल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरल्याचीही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. BJP Office bearers are angry over his removel 

सतत चार वेळा खासदार...
खासदार संजय धोत्रे हे मराठा समाजाचे नेतृत्व आहे. सलग चार वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. महाबीजचे संचालकही होते, वेगवेगळ्या समितीच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांचा अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. सध्याच्या मंत्रिपद बदलांमध्ये संजय धोत्रे यांचे पद जाणार याबाबत कुठलीही कल्पना अकोला भाजपमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नव्हती. परंतु, त्यांना अचानक पदावरून काढण्याचा निर्णय झाला आणि त्यांचा राजीनामा घेण्यात आला. 

जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज...
संजय धोत्रे यांना मंत्रिपदावरून काढण्यात आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्य, विकास कामांमधली कमी, अशी कारण पुढे करण्यात आली. पण 
यामध्ये काही तथ्य नाही. केवळ पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे धोत्रे यांचा बळी देण्याची भावना जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. केवळ नवीन लोकांना संधी देण्यासाठी हे सर्व फेरबदल करण्यात आल्याचेही भाजपच्या अंतर्गत गोटात बोलले जात आहे. एकाच म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना खूष करण्याचा हा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असल्याचीही माहिती आहे. पण यामुळे कुणीही खूष झालेले नसून नाराजी मात्र वाढली असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. 

कशी दूर करणार नाराजी…
केंद्र सरकारच्या गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीत ज्या लोकांच्या कामाची काहीच छाप नाही, अशांना मंत्रिपदी बसवण्यात आले आहे. संजय धोत्रे यांना भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे मंत्रिपदावरून काढण्यात आल्याची भावना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. ज्यांना ज्यांना आज मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला, त्यांच्या मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. या नाराजीवर पक्षश्रेष्ठी काय समाधान शोधतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com