भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची चक्क मिरवणूक! 11 गाड्यांच्या ताफ्याने सेवेत दाखल - Corrupt police officers enter the station in procession | Politics Marathi News - Sarkarnama

भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची चक्क मिरवणूक! 11 गाड्यांच्या ताफ्याने सेवेत दाखल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 जून 2020

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे याची माहिती आंबेडकरनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अलोक प्रियदर्शी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या पोलिस निरिक्षकास निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडून चौकशीही होणार आहे. 

सातारा : नेत्यांची विजयी मिरवणूक आपण सर्वांनी पाहिली असेल, पण उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात चक्क एका भ्रष्टाचाराचे आरोपामुळे बदली झालेल्या पोलिस निरिक्षकाची मिरवणूक काढण्यात आली. बदली झालेल्या पोलिस स्टेशनपर्यंत ही मिरवणूक गेली. या मिरवणूकीत पोलिसांच्या तब्बल अकरा गाड्यासह अधिकारी व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आंबेडकरनगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकाराबद्दल संबंधित निरिक्षकास निलंबित केले. 

राजकिय नेत्याची निवडणुकीतील विजयीनंतर आपण मिरवणूक पाहतो. पण, एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची मिरवणूक कधीच पहायला मिळत नाही. पण उत्तर प्रदेशातील पोलिसांनी हे शक्‍य करून दाखविले आहे. आंबेडकरनगर जिल्ह्यातील बसखरी पोलिस चौकीतील पोलिस निरिक्षकाची बदली झाल्याने त्याची ज्या पोलिस चौकीत बदली झाली तिथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. 

हेही वाचा ः बारावीचा निकाल 14, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागणार

मनोज सिंह असे या पोलिस निरिक्षकाचे नाव आहे. या पोलिस निरिक्षकावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत. त्याच्यावर कारवाई होण्यासाठी तेथील भाजपच्या आमदाराने धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मनोहर सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र, बदलीनंतर मनोहर सिंह यांची त्यांच्या पोलिस ठाण्यापासून बदली झालेल्या पोलिस ठाण्यापर्यंत चक्‍क मिरवणूक काढण्यात आली. 

आवश्य वाचा ः अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि मुख्य आर्थिक सल्लागारांनी विकास दराचे अंदाज मांडावेत : पृथ्वीराज चव्हाण

या मिरवणूकीत पोलिसांच्या अकरा गाड्यांचा ताफ्यातून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे याची माहिती आंबेडकरनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अलोक प्रियदर्शी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या पोलिस निरिक्षकास निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडून चौकशीही होणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख