मंत्रिपदाच्या स्पर्धेत शंभूराज देसाई अग्रस्थानावर...

 मंत्रिपदाच्या स्पर्धेत शंभूराज देसाई अग्रस्थानावर...

कोयनानगर (जि. सातारा) : पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार शंभूराज देसाई यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत असण्याची दाट शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या शिवमहाआघाडीचे सरकार सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना ही राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत आघाडी करून सत्तेत विराजमान होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून पाटण विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केलेले आमदार देसाई यांचे नाव मंत्रीपदासाठी यादीत असल्याचे सांगितले जात आहे. 

शंभूराज देसाई यांना मागील वेळी पालकमंत्री पद मिळेल अशी आशा होती. मात्र, शिवसेनेने विजय शिवतारेंना संधी दिली. यावेळेस विजयाची हॅटट्रीक करणाऱ्या शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार निवडून आलेले असल्याने पक्षाला जिल्ह्यात ताकद देण्यासाठी श्री. देसाई यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत असण्याची शक्‍यता बळावली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com