शंभूराज देसाईंना हवी सातारा जिल्हा बॅंकेतही महाविकास आघाडी

 शंभूराज देसाईंना हवी सातारा जिल्हा बॅंकेतही महाविकास आघाडी

सातारा : ""राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते खाली ही यावे, हे माझे मत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी दिवसाची, अशी आमची इच्छा आहे. याबाबत वरिष्ठांची चर्चा करून ते जसे आदेश देतील, तसे काम करणार आहे, असे ठाम मत वित्त व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. दरम्यान, बाजार समित्या भक्‍कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्री देसाई यांनी वित्त, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास आदी विभागांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मार्च महिन्यास दोन महिने राहिले असून, अखर्चित निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दोन- तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांचा निधी मार्गी लागला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात निधी वाढवून मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.'' 

जिल्हा बॅंकेचे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका काय असणार या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते खाली यावे, हे माझे मत आहे. वरिष्ठांची चर्चा करून ते जसे आदेश देतील, तसे काम करणार आहे. बाजार समित्या भक्‍कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील.'' 
कौशल्य विकासावर भर देण्याचा पवारांकडून सल्ला 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यास गेलो. तेव्हा त्यांनी कौशल्य विकासवर विशेष भर देण्यास सांगितले. आयटीआयचे पारंपरिक कोर्स बदलून कंपन्यांना आवश्‍यक ते अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सकाळीच माझी भेट घेतली. त्यांच्याबरोबर कौशल्य विकास वाढीसाठी प्रयत्न करता येतील का, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले. 
आयजी, एसपींना राज्यमंत्र्यांचा चहा 
विशेष महानिरीक्षक (आयजी) सुहास वारके, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सकाळी माझ्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांना मी चहा दिला, असे मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले. त्यावर तुम्ही एसपींवर दाखल केलेल्या राजशिष्टाचार भंगाचे काय झाले, असा प्रश्‍न विचारला गेला. ""विधिमंडळात मी तक्रार केली असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. गृहखात्याचा मी मंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार ते मला भेटण्यास आले होते,'' असे उत्तरही त्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com