उपसभापती झीरवाळ म्हणाले, "माझं काम दिसत नाही, मी स्वस्थ बसत नाही '

उपसभापती झीरवाळ यांचा मतदारसंघ गुजरात सीमेला लागून असलेला आदिवासी बहुल आहे. येथील आदिवासी रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात
 उपसभापती झीरवाळ म्हणाले, "माझं काम दिसत नाही, मी स्वस्थ बसत नाही '

नाशिक : "कोरोना' संसर्ग सुरु झाल्यापासून विधानसभेचे सभापती नरहरी झीरवाळ आपल्या गावी वनारे (दिंडोरी) येथे मुक्कामी आहेत.
भेटायला येणाऱ्यांची त्यांच्याकडे रिघ लागलेली असते.

"सध्या काय चालले आहे?' विचारले, त्यांच्या हजरजबाबी स्वभावाला साजेशे उत्तर येते, "माझे काम काही दिसत नाही. अन्‌ मी स्वस्थ काही बसत नाही.' या उत्तरावर उपस्थित तेव्हढ्याच मोकळेपणाने दाद देतात.

. शेतकरी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी गुजरातला जातात. उत्तर भारतातून मजूर येथे कारखान्यांत नोकरीसाठी येतात. भाजीपाला, स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि वाईन त्यांच्या मतदारसंघाचे वैशिष्ठ्ये. 

थोडक्‍यात कॅलीफोर्नियाचे प्रतिबिंब या मतदारसंघात दिसते. तेव्हढीच व्विवधता असलेली मंडळी उपसभापती झीरवाळ यांच्याकडे समस्या घेऊन येतात. गेल्या चार दिवसांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध खात्यांचे अधिकारी ते अगदी तहसीलदार यांच्यापर्यंत सगळ्यांशी संपर्क करुन या मंडळींचे प्रश्‍न सोडवले. त्यामुळेच रात्रभर त्यांचा फोन सुरु असतो. शेतकरी, मजूर, नागरीक त्यांच्याकडे समस्या घेऊन जातात.

काल त्यांनी बार समितीला भेट दिली. येथील कांदा मार्केट बंद ठेवले जाणार होते. तसे केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल. भाव गडगडतील. मालाची वाहतूक खोळंबेल. अशा अडचणी घेऊन शेतकरी आले होते. 

त्यांनी लगेच संबंधीत व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेऊन "कोरोनालाही दुर ठेवा, पण एकदमच सगळे निर्मनुष्य झाले तर कसे चालेल. अडचणच होईल. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा अन्‌ शेतकऱ्यांची अडचण सुद्धा पळवा' त्यांच्या या मजेशीर संवादाने सगळ्यांनीच सहमती दर्शवत कांदा बाजार व लिलाव सुरु ठेवले.

यावेळी त्यांच्या हस्ते बाजार समितीत शिवभोजन केंद्राचे उद्‌घाटन झाले. मात्र औपचारीकता बाजुला ठेवत ते थेट स्वयंपाक करणाऱ्या महिलांना त्यांनी कोरोनाचे दुष्परिणाम व त्यापासून सगळ्यांचे संरक्षण करणे तुमच्या हाती कसे आहे हे समजावून सांगितले. आलेल्या लाभार्थींना त्यांनी स्वतः ताट वाढले. त्यानंतर केंद्र चालक अडचणी सांगू लागला. 

त्याआधीच त्याची अडचण हेरून ते म्हणाले, "तुम्हाला शंभर थाळ्या मंजूर आहेत. बाजार समितीत येणारे लोक, गावाची लोकसंख्या पाहता त्या पुरेशा नाहीत. मला माहिती आहे. त्या वाढवल्या पाहिजे. मात्र ही सुरवात आहे. थोड्या दिवसांनी वाढतील.'

यावेळी बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा पिरषद सदस्य भास्कर भगरे (सर), विलास कड, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, मनोज शर्मा, श्‍यामराव हिरे, मधुकर भरसट, शरद महाले, छबुराव मटाले, दत्तात्रय चव्हाण, तौसिफ मनियार, निलेश गटकळ, दुर्गेश चित्तोडे, अतुल पाटील, प्रकाश वाघ, शहा साहब, मोसिन शेख, ईरफान शेख आदी उपस्थितीत होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com