demotion of numbers of psis | Sarkarnama

सेटिंग करून फौजदार झालेल्यांना पुन्हा हवालदार केले : पोलिस महासंचालक कार्यालयाला आली जाग

अनिल कांबळे
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

नागपूर : अनुत्तीर्ण हवालदारांना पोलिस महासंचालक कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे फौजदारपदी पदोन्नती दिल्याचे उघडकीस आल्यानंतर या कार्यालयाची कथित कार्यक्षमता पुढे आली. आता माध्यमांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर सेटिंगवाल्या फौजदारांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे. 

पोलिस महासंचालकाच्या अधीनस्थ 2013 साली घेण्यात आलेल्या हवलदारांना पदोन्नती देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डावलल्याचे "सकाळ'ने उघडकीस आणले. त्याची दखल आस्थापना विभागाने घेतली आणि तातडीने नोटीस काढून पीएसआय पदावर पदोन्नती दिलेल्याना पदन्नवत केल्याचे जाहीर केले.

या परीक्षेत पास झालेल्या हवालदारांना न्याय मिळवून देण्यासाठी "सकाळ'ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महासंचालक कार्यालय खडबडून जागे झाले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पीएसआय पदाच्या पदोन्नतीचा तिढा सुटण्याची शक्‍यता आहे. 

पोलिस दलाची 30 वर्षांपेक्षा जास्त अविरत सेवा करणारा हवालदार किमान अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, या हेतूने तत्कालिन पोलिस महासंचाल संजीव दयाळ यांनी 2013 मध्ये हवालदारांची अर्हता परीक्षा घेतली होती. यामध्ये जवळपास 18 हजार कर्मचारी पास झाले होते. पास झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी लावताना पोलिस महासंचालक कार्यालयातील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आस्थापना विभागातील बाबूंनी संगनमत करून कोट्यवधीचा घोटाळा केला. नापास झालेल्यांना चक्‍क पीएसआय म्हणून पदोन्नती देत पास झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला.

प्रसारमाध्यमांनी यादीत झालेला घोळ बाहेर काढला. राज्यभर बोभाटा झाल्यानंतर आस्थापना विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. पदोन्नती दिलेल्या नापास कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयात उपस्थित करण्यात आले. कक्षात सुनावणी घेऊन त्यांचे पीएसआय पद रद्‌द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता नापासऐवजी पास कर्मचाऱ्यांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे. 

नियुक्‍ती केली रद्‌द 
आस्थापना कार्यालयात "सेटींग' करून मिळवलेले पीएसआय पद जास्त काळ तग धरू शकले नाही. तक्रारी आणि माध्यमांच्या रेट्यामुळे अनेक नापास झालेल्या हवालदारांची पेशी आस्थापना कार्यालयात घेण्यात आली. त्यांची समजूत घालून त्यांचे उपनिरीक्षक पद काढून घेण्यात आले. त्यांना पुन्हा हवालदार म्हणून काम करावे लागणार आहे. 

महासंचालकांकडून अपेक्षा 
पोलिस महासंचालक दत्तात्रय पळसलगीकर हे येत्या 28 फेब्रूवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पास झालेल्या हवालदारांचा पीएसआय बनण्याचे स्वप्न करून दिलासा द्यावा, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलिस महासंचालकांनी सकारात्मकता दाखविल्यास पीएसआय पदाची पहिली यादी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख