Demand for renaming Mumbai Centtral | Sarkarnama

आता  मुंबई सेंट्रलच्या नामांतरासाठी इशारा 

श्वेता चव्हाण 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

..

मुंबई  :वारंवार पाठपुरावा करुनही मुंबई सेंट्रल टर्मिनसला नामदार नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी जाहीर नाम्यात समाविष्ट करा, अशी मागणी नामदार जगन्नाथ शंकर शेठ प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. जो पक्ष जाहीर नाम्यात ही मागणी समाविष्ट करणार नाही त्याला मत देणार नाही असा इशाराच प्रतिष्टानच्या वतीने देण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामाकरणावरुन गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. नाना शंकरशेठ यांच्या बरोबबरच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचीही मागणी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नामांतर होण्यापुर्वी व्हिक्‍टोरिया टर्मिनसला नानांचे नाव देण्याची मागणी 1982 पासून करण्यात आली होती. मात्र,ती मागणी पुर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर नानांचे नाव मुंबई सेंट्रलला देण्याची मागणी होऊ लागली. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन सकारात्मक प्रतिसाद मिळविला आहे. मात्र मागणीची अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे प्रतिष्ठानाकडून सांगण्यात आले. 

 आगामी विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरनाम्यात मुंबई सेंट्रल टर्मिनसला नामदार नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण करण्याची मागणी असावी. ज्या पक्षांच्या जाहीरनाम्यात हि मागणी नसेल त्या पक्षाला मत देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. 

मुंबई सेंट्रल टर्मिनस'चे 'नाना शंकरशेट टर्मिनस' असे नामकरण करण्यासाठी सह्यांची मोहीम, पथनाट्य, मूक निदर्शने अशा अनेक प्रकारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्र व राज्य सरकार, रेल्वेमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख तसेच, लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. पण, या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. असा दावा या प्रतिष्टानकडून करण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख