आम्हाला सोडवा, चीनमधून आश्‍विनी पाटील यांची आर्तहाक 

 आम्हाला सोडवा, चीनमधून आश्‍विनी पाटील यांची आर्तहाक 

सातारा : मुळच्या साताऱ्याची असलेली आश्‍विन अविनाश पाटील ही चीनमधील वुहान प्रांतात अडकली आहे. याबाबत तिने आज सोशल मिडियावर व्हिडीओच्या माध्यमातून आपली भुमिका मांडताना भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

यामध्ये भारतीय सरकाने आम्हाला येथून सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

अश्‍विनीची आई मुळची साताऱ्यातील मल्हारपेठेतील. 18 फेब्रुवारी2018 रोजी अश्‍विनीचा विवाह पोलंड येथील ऍलन गोल्डमन यांच्याशी झाला आहे. ते फायनान्स कंट्रोलर म्हणून पोलंड स्थित कंपनीत काम करतात. आठ महिन्यांपूर्वी त्यांची चीनला बदली झाली. यामध्ये ते वुहान शहरात कंपनीच्या कामानिमित्त पत्नी आश्‍विनीसह राहात आहेत. 

आत आश्‍विनीने सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल करून आपल्याला भारत सरकारने सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तिने वुहान शहरातील वास्तव मांडताना म्हटले की, वुहान शहरात मी माझ्या पतीसोबत आठ महिन्यापूर्वी आलेली आहे. त्यांची येथे बदली झाली होती.

पण वुहानमध्ये सध्या कोरोना व्हायरस पसरला आहे. येथील चाळीस लाख लोकांना या व्हायरसने बाधित केले आहे. 908 लोकांचा बळी गेलेला आहे. अजून 25 हजार लोकांना व्हायरसने बाधित केले आहे. हा व्हायरस दोन ते तीन तास हवेत राहू शकतो. त्यामुळे आमचे बाहेर जाणे बंद झालेले आहे. 23 जानेवारीपासून वुहान शहर पूर्णपणे बंद आहे. सगळे दुकाने वाहतूक बंद आहे. 

केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. सुपर मार्केट व मेडिकल्स चालू आहोत. येथे केवळ मास्क आणि महत्वाच्या वस्तु ज्यातून आम्ही आमचा बचाव करू शकतो. माझे पती भारतीय नागरीक नाहीत. त्यांना दोन दिवसांपूर्वी पोलंडच्या दुतावासाने येथून घेऊन गेले आहेत. भारताने मध्यंतरी विमान पाठवून आपल्या नागरीकांना मायदेशी नेले. त्यावेळी मला येता आले नाही. 

कारण माझा पासपोर्ट वुहान शहरातील ब्रिटीश दुतावासात ब्रिटीश व्हिसा मिळविण्यासाठी दिला होता. मात्र, कोरोना व्हायसर पसरल्याने दुतावास बंद पडल्याने तेथेच माझा पासपोर्ट अडकला आहे.

त्यामुळे माझा पासपोर्ट माझ्याकडे नाही. भारतीय दुतावास आपल्या वुहानमधील नागरीकांना परत नेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारला माझी एवढीच विनंत आहे. भारत सरकाने काहीतरी उपाय करून येथे अडकलेल्या आम्हा 70 लोकांना बाहेर काढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com