delhi and beed youth | Sarkarnama

आरक्षणासाठी बीडच्या युवकांचे दिल्लीत धरणे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात बीड जिल्ह्याच्या मातीतूनच झाली. आता दिल्लीतही आंदोलनाचा झेंडाही बीडकरांनीच रोवला आहे. परळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठोक मोर्चा नंतर मागच्या 20 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरुच आहे. याची धग राज्यभर पोचून सर्वत्र विविध आंदोलने झाली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. 

या आंदोलनामुळे मेगा भरती तुर्त थांबविण्याचाही निर्णयही झाला. याच मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील युवकांनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर धरणे धरले. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनीही आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या कार्यालयांमध्ये मागण्यांचे निवेदन दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख