Defence Studies Institute Named After Manohar Parrikar | Sarkarnama

दिल्लीच्या 'आयडीएसए' संस्थेला मनोहर पर्रिकर यांचे नाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

सरकारी थिंक टॅंक मानल्या जाणाऱ्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडिज अँड अॅनालिसिस (आयडीएसए) या संस्थेला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे

नवी दिल्ली : सरकारी थिंक टॅंक मानल्या जाणाऱ्या येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडिज अँड अॅनालिसिस (आयडीएसए) या संस्थेला माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे. पर्रिकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून 'आयडीएसए'चे नामकरण 'मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडिज अँड अॅनालिसिस' असे करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली.

भाजपचे नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेले पर्रिकर हे 2014 ते 2017 या काळात देशाचे संरक्षणमंत्री होते. मागील वर्षी 17 मार्च रोजी कर्करोगाने त्यांचे पणजी येथे निधन झाले. पर्रिकर यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले होते. त्या वेळी पर्रिकर यांनी मोठे धैर्य दाखवून धाडसीपणे या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख