अजितदादांकडे दीपिका चव्हाणांचे साकडे, `आदिवासींसाठी खावटी योजना सुरू करा'

महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी आहेत. "कोरोना'मुळे त्यांचे सर्वच कामकाज ठप्प आहे. रोजगार गेला आहे. त्यामुळे त्यांना "लॉकडाऊन'मधून बाहेर काढण्यासाठी खावटी कर्ज योजना पुन्हा सुरु करुन त्यांना आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
deepika chavan demands to start loan scheme for tribal community
deepika chavan demands to start loan scheme for tribal community

नाशिक ः महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी आहेत. "कोरोना'मुळे त्यांचे सर्वच कामकाज ठप्प आहे. रोजगार गेला आहे. त्यामुळे त्यांना "लॉकडाऊन'मधून बाहेर काढण्यासाठी खावटी कर्ज योजना पुन्हा सुरु करुन त्यांना आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन दिले.

कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने केलेल्या "लॉकडाउन'मुळे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबांचा प्रश्‍न जटिल बनला आहे. आदिवासी विभागातर्फे देण्यात येणारे खावटी कर्जवाटप योजना आघाडी शासनाने पूर्ववत सुरू करून आदिवासी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील आदिवासी ग्रामीण भागात शेती तसेच शहरी भागात अन्य कामांसाठी स्थलांतरीत होतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्हाव चालतो. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आदिवासी राज्यभर मजुरीसाठी जातात. शेजारच्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील आदिवासी मध्य प्रदेश, गुजरात राज्यात मजुरीसाठी जातात. लॉकडाऊन झाल्यावर ते अडकून पडले. त्यांची उपासमार झाली. अनेकांनी शेकडो मैल पायी आपल्या मुळ गावी परतले. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट आहे. राज्यात गेल्या पंचवार्षिकमध्ये युतीचे शासन आल्यानंतर त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी चालत आलेली खावटी कर्जवाटप योजना बंद केली होती. आता कोरोनामुळे 14 एप्रिलपर्यंत शासनाने "लॉकडाउन' जाहीर केल्याने मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या आदिवासींचे रोजगार बंद झाले आहेत. आदिवासींना पूर्ववत खावटी कर्ज मिळाले, तर त्यांचे दैनंदिन प्रश्‍न, मुला-मुलींचे पैशांअभावी रखडलेले विवाह होतील व खऱ्या अर्थाने आघाडी शासनाची मदत मिळेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com