पद जाहीर होताच दीपाली धुमाळ हसल्या...नंदाताई मात्र रडल्या

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेचपदाची प्रक्रियाही चर्चेची ठरली....
deepali dhumal-nanda lonkar
deepali dhumal-nanda lonkar

पुणे : महापौर, स्थायी समिती अध्यक्षपद हुकल्याने विरोधी पक्ष नेतेपदाची शर्यत जिंकण्याच्या इराद्याने उरतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर या हे पद खेचून आणण्यात स्वपक्षातच तिसऱ्यांदा हरल्या. या शर्यतीत अचानकपणे उडी घेत, आपल्या स्पर्धकांना आश्‍चर्याचा धक्का देणाऱ्या नगरसेविका दीपाली धुमाळ मात्र जिंकल्या.

महापालिकेतील पदासाठीचा संघर्ष आपला पदर सोडत नाही आणि पात्रतेच्या पावत्या दाखवूनही आपल्याला डावलत नेतृत्वाने विरोधीपक्ष नेतेपदाचा मान दीपाली धुमाळ यांना मिळताच नंदाताई रडल्या. दुसरीकडे, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावरील जबाबदारी वाढविल्याने दिपालीवाहिनी हसल्या.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडले आणि नव्या नेत्यासाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांत शर्यत लागली. तेव्हाच, विरोधी पक्षनेतेपदावर महिलेला संधी देण्याचा अजितदादांचा "शब्द' पुढे करीत, या पदासाठी नंदाताई यांच्यासह माजी महापौर वैशाली बनकर, स्थायीच्या माजी अध्यक्ष अश्‍विनी कदम यांनी मार्चेबांधणी केली. त्याचवेळी फारसा गाजावाजा न करता दीपाली धुमाळ यांनीही विरोधी पक्षनेतेपद मागितले आणि त्यासाठी रितसर अर्जही केला.

"वैशालीताई आणि अश्‍विनीताईंना मोठी पदे मिळाली आहेत आणि मला तसे काहीच मिळाले नाही,' असे उघडपणे बोलत या पदासाठी नंदाताईंनी आपला दावा पुकारला. याआधी महापालिकेत 2012 ते 2017 या राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नंदाताईंनी प्रयत्न केले होते. मात्र. तेव्हा, महापौरपद वैशाली बनकर, तर स्थायी अश्‍विनी कदमांकडे गेली होती. त्यामुळे त्यांच्याशी आपली स्पर्धा नाही आणि दिपाली धुमाळ फार काही अडचणीच्या ठरू शकणार नाहीत, असा नंदा लोणकरांचा समज होता.

त्यामुळे जेव्हा नव्या विरोधी नेत्यासाठी निवडीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून सर्वच पातळ्यांवर आघाडी घेतल्याचा दावा करीत, हे पद माझ्याकडेच येईल, असा विश्‍वास लोणकरांना होता. या पदासाठी नंदाताईंच्या नावावर अजितदादांनी शिक्कामोर्तब केल्याची बुधवारी रात्रीपासून पसरविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या  नावाची घोषणा एक औपचारिकताच राहिल्याची चर्चा होती. मात्र, या पदासाठी अद्याप कोणाचेही नाव निश्‍चित झाले नसल्याचे स्थानिक नेतृत्वाने गुरुवारी स्पष्ट केले होते. तरीही, चर्चेत मात्र, लोणकरांचे पारडे जड राहिले. नव्या नेत्याच्या निवडीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी शुक्रवारी दुपारी पक्षाच्या नगरसेवकांनी बैठक बोलविली आणि तित दिपाली धुमाळ यांचे नाव जाहीर केले. विरोधी पक्षनेतेपद दिपाली यांच्याकडे गेल्याचे कानावर येताच नंदाताईंना गडबडल्या. तेव्हा, एकीकडे, धुमाळ यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर, लोणकर प्रचंड ताणात असल्याचे दिसत होते. आपल्या नावाची घोषणा होताच दिपाली धुमाळ मनापासून हसल्या.त्यांच्या अभिनंदनाचा छोटेखानी कार्यक्रम आटोपून बाहेर पडलेल्या लोणकरांना मात्र अश्रू अनावर झाले. "महापालिकेतील पद मिळविण्यात सतत अपयश का येत असावे,' हाच सतत सातवणारा प्रश्‍न घेऊन महापालिकेतून त्यांना काढता पाय घेतला. 

त्या म्हणाल्या, ""विरोधी पक्षनेतेपद हवे होते, त्यासाठी आग्रही धरला होता. मात्र, माझ्या सहकारी दीपाली धुमाळ यांच्याकडे ते पद गेले. पण आम्ही सगळजणी एकत्र छान काम करू,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com