अजितदादांनी फटकारलेले दीपकआबा साळुंखे हसतमुखाने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

विरोधी पक्षातील उमेदवाराला साथ दिल्याने पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आता साळुंखे-पाटील बिनधास्तपणे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे.
अजितदादांनी फटकारलेले दीपकआबा साळुंखे हसतमुखाने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

सोलापूर : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना पक्षाने सांगोला मतदारसंघातून उमेदवारीही दिली मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शेकापचा उमेदवार पराभूत झाला. निवडणुकीनंतर आता साळुंखे-पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले आहेत.

जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. जिल्हाध्यक्ष म्हणून दिपक साळुंखे-पाटील यांना चांगले काम केल्याने त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून पक्षाकडून संधी मिळाली. त्यांनी दुसऱ्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढविली मात्र, त्यामध्ये प्रशांत परिचारक यांनी बाजी मारली.

त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाने नव्याने अर्ज मागविले. जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्यासह अनेक दिग्गजांनी अर्ज करुन मुलाखतीही दिल्या. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाडीचे स्वारस्थ दिपक साळुंखे करायचे. त्यांची पवारांशी जवळकीता सर्वांनाच ज्ञात असल्याने अपेक्षेप्रमाणे साळुंखे यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपविण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेते इनकमिंग जोरात सुरु असतानाच साळुंखे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान, त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. मात्र, सांगोल्यातून शहाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा शिवसेना पक्षप्रेवश लांबला. निवडणुकीनंतर आता समीकरणे बदलली आणि दिपक साळुंखे-पाटील राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊनही त्यांच्यावर पक्षाने का कारवाई केली नाही, अशी चर्चा आहे.

ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांचा नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापने सांगोल्यातून उमेदवारी दिली. सर्वात तरुण उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. तत्पूर्वी, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शेकापचे उमेदवार गणपतराव 11 वेळा आमदार झाले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिपक साळुंखे-पाटील यांना पक्षाने उमदेवारी दिली. दरम्यान, करमाळ्याचे उमेदवार संजय घाटणेकर व सांगोल्यातून दिपक साळुंखे-पाटील यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यावेळी अजित पवार यांनी जाहीर सभेतून त्यांच्यावर आगपाखड केली. त्यामुळे घाटणेकर यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला तर साळुंखे-पाटील यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतला. त्यामुळे डॉ. अनिकेत देशमुख यांचा निसटता पराभव झाला. बंडखोरी केली अथवा विरोधी पक्षातील उमेदवाराला साथ दिल्याने पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आता साळुंखे-पाटील बिनधास्तपणे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com