साताऱ्यात राष्ट्रवादीच्या हाताला लागले 'भाजपचे पवार'!

साताऱ्यात राष्ट्रवादीच्या हाताला लागले 'भाजपचे पवार'!

दीपक पवार यांच्यासमोरच शिवेंद्रसिंहराजेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते नाराज आहेत.

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार हे येत्या २२ सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवार यांच्यासमोरच शिवेंद्रसिंहराजेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात त्यांची उमेदवारी जाहीर होवू शकते. यासंदर्भाने पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी दीपक पवार, आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील उपस्थित होते.
   
2014 मध्ये दीपक पवार हे साताऱ्यात भाजपचे उमेदवार होते. यावेळीही ते प्रबळ दावेदार होते. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजपप्रवेशानंतर त्यांनी बंडाचे निशान फडकावले, मात्र पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. शिवाय साताऱ्यात महाजनादेश यात्रेवेळी फडणवीस यांनी दिपक पवारांच्या समोरच शिवेंद्रसिंहराजेंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com