पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ नाही!

नियम विचारात घेता सदर मतदार संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी १० दिवसांपर्यंत मतदार यादीत नांव दाखल करण्यासाठी अर्ज/ दावा दाखल करण्याची तरतूद निरंतर मतदार यादी अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने उपलब्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ नाही!

पुणे : मतदार नोंदणी अधिनियम १९५० चे कलम ३१(३) अन्वये जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदार म्हणून दावा/ अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ पर्यत मुदत दिलेली आहे.

सदर मुदतीत वाढ करावी, एक महिना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवावी, अशा आशयाची मागणी विविध संघटना व राजकीय पक्षाने केली असली तरी सदर कार्यक्रम हा मतदार नोंदणी अधिनियम १९५० मधील विहीत तरतुदी प्रमाणे आहे. त्यात बदल करण्याची सद्यस्थितीत कोणतीही तरतूद नाही, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, मतदार यादी निरंतर अद्यायावत (CONTINUOUS UPDATION) करण्याची तरतूद असल्याने जानेवारी २०२० पासून पुन्हा नव्याने मतदार यादीत नांव दाखल करण्याची संधी पात्र मतदारांना उपलब्ध असणार आहे. सध्याचे संबंधित मतदार संघाच्या आमदारांचा कालावधी १९ जुलै २०२० पर्यंत आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची आगामी निवडणूक जाहीर करण्यात येईल. मतदार नोंदणी अधिनियमाचे कलम  २३ प्रमाणे  तसेच याबाबत अनुषंगिक नियम विचारात घेता सदर मतदार संघाच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी १० दिवसांपर्यंत मतदार यादीत नांव दाखल करण्यासाठी अर्ज/ दावा  दाखल करण्याची तरतूद निरंतर मतदार यादी अद्ययावत करण्याच्या  अनुषंगाने उपलब्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com